शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
3
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
4
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
5
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
6
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
7
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
8
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
9
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
10
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
11
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
12
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
13
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
14
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
15
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
16
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
17
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
18
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
19
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
20
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...

सनी देओलला एकीकडे दिलासा, तर दुसरीकडे डोकेदुखी वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 06:38 IST

चित्रपट अभिनेता सनी देओलला एकीकडे दिलासा मिळाला, तर दुसरीकडे समस्या उभी राहिली आहे.

चंदीगड  -  चित्रपट अभिनेता सनी देओलला एकीकडे दिलासा मिळाला, तर दुसरीकडे समस्या उभी राहिली आहे. पंजाबच्या गुरदासपूर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या तिकिटावर प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सनीला एकाच वेळी अनेक मोर्चांवर तोंड द्यावे लागत आहे.सनी देओलच्या नावावरून भाजप सध्या अडचणीत सापडला आहे. त्याच्या नावाबाबत भाजपने निवडणूक आयोगाचा दरवाजा ठोठावला आहे. मतदार यादी व इतर दस्तावेजांमध्ये त्याचे नाव अजय सिंह धर्मेंद्र देओल असे लिहिलेले आहे, ही खरी भाजपची डोकेदुखी आहे. हेच नाव ईव्हीएमवर येणे साहजिक असले तरी या नावाने त्याला कोणीही ओळखत नाही. त्यामुळे ईव्हीएमवर सनी देओल असे नाव यावे, यासाठी भाजपने निवडणूक आयोगाकडे अर्ज दाखल केला. हे प्रकरण तडीला लावण्याची जबाबदारी भाजपने पठाणकोटचे महापौर अनिल वासुदेवा यांच्याकडे सोपविली होती. ती त्यांनी यशस्वीरीत्या निभावलीही. ईव्हीएम व मतपत्रिकेवर आता सनी देओल नाव लिहिण्याची त्यांनी मंजुरी मिळवली.एक प्रकरण मार्गी लागले असतानाच सनीसमोर दुसरी समस्या उभी राहिली आहे. यावेळी शिवसेना हिंदचे राष्टÑीय अध्यक्ष निशांत शर्मा यांनी सनीला धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणात अडकवले आहे. अमृतसर व मोहालीमध्ये याबाबत तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, त्यात म्हटले आहे की, धार्मिक भावना दुखावल्याबद्दल त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी. रोड शो दरम्यान सनी देओल ज्या वाहनावर पाय सोडून बसला होता, तेथे भगवान शिवाचे चित्र होते. सनीचे पाय देवाच्या चित्राला लागत होते, अशी तक्रार आहे. या समस्येतून सनी देओल कसा मार्ग काढील, हे आता पाहावे लागेल.

टॅग्स :Sunny Deolसनी देओलLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक