शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
2
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
3
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
4
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
5
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
6
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
7
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
8
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
9
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
10
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
12
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लग्नातील Unseen Photos आले समोर, एकदा पाहाच!
13
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
14
'सर्कीट' नाही तर 'हे' विचित्र नाव ठेवलं होतं, अर्शदने सांगितला 'मुन्नाभाई'चा जबरदस्त किस्सा
15
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
16
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
17
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
18
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
19
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
20
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव

दिल्ली मद्य घोटाळ्यातील पैसा गेला कुठे? स्वतः केजरीवाल करणार खुलासा, पत्‍नीचा मोठा दावा...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 2:42 PM

Sunita Arvind Kejriwal AAP : सुनीता केजरीवाल यांनी व्हिडिओ जारी करुन मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांबाबत मोठा दावा केला आहे.

Sunita Arvind Kejriwal AAP : दिल्ली मद्य घोटाळ्यातील कथित मनी लॉड्रिंगप्रकणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोर्टाने अंमलबजावणी संचालनालयाच्या ताब्यात दिले आहे. ED सतत त्यांची चौकशी करत आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधला. मद्य घोटाळा काय आहे आणि या घोटाळ्यातील पैसा कुठे गेला? याचा खुलासा स्वतः अरविंद केजरीवाल 28 मार्च रोजी न्यायालयात करणार असल्याची माहती सुनीता यांनी दिली.

सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये सुनीता केजरीवाल म्हणतात, ED ने गेल्या दोन वर्षांत या तथाकथित मद्य घोटाळ्याप्रकरणी 250 हून अधिक छापे टाकले, पण त्याच्याशी संबंधित एकही पैसा जप्त केलेला नाही. मनीष सिसोदिया, संजय सिंह, सत्येंद्र जैन यांच्यासह आमच्या घरात छापेमारी केली, पण काहीच सापडले नाही. मुख्यमंत्र्यांनी नेमकी काय चूक केली, ते मला सांगा? या लोकांना दिल्लीतील जनतेचा नाश करायचा आहे का? असा प्रश्न त्यांनी यावेळी विचारला.

सुनीता केजरीवाल पुढे म्हणाल्या, काल(दि.26) मी त्यांना भेटायला गेले होते, त्यांची शुगर लेव्हल खाली आली आहे, तरीदेखील ते काम करत आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी दिल्लीच्या जलमंत्री आतिशी यांना पत्र लिहून लोकांच्या पाणी आणि गटार समस्या सोडवण्याचे निर्देश दिले होते. अरविंदजी हे सच्चे देशभक्त आणि धाडसी व्यक्ती आहेत. अरविंदजी मला म्हणाले की, माझे शरीर तुरुंगात आहे, पण माझा आत्मा दिल्लीतील जनतेसोबत आहे.

भाजपकडून चौकशीची मागणी दुसरीकडे भाजपच्या दिल्लीतील शिष्टमंडळाने बुधवारी पोलीस आयुक्त संजय अरोरा यांची भेट घेतली. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ईडीच्या कोठडीतून मंत्र्यांना पाठवलेल्या पत्रांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. ईडीच्या ताब्यात असलेल्या व्यक्तीकडून अशी पत्रे कशी येऊ शकतात, असा प्रश्न त्यांनी केला. माझ्या माहितीप्रमाणे ही पत्रे बनावट आहेत, असा दावाही त्यांनी यावेळी केला. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपdelhiदिल्लीBJPभाजपाEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय