Sunil Jakhar joins BJP: काँग्रेसचे दिग्गज नेते सुनील जाखड यांचा भाजपमध्ये प्रवेश, नरेंद्र मोदींचे केले तोंडभरुन कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 15:03 IST2022-05-19T15:03:08+5:302022-05-19T15:03:43+5:30
Sunil Jakhar joins BJP: दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सुनील जाखड यांना भाजपचे सदस्यत्व मिळवून दिले.

Sunil Jakhar joins BJP: काँग्रेसचे दिग्गज नेते सुनील जाखड यांचा भाजपमध्ये प्रवेश, नरेंद्र मोदींचे केले तोंडभरुन कौतुक
Sunil Jakhar joins BJP:काँग्रेसलापंजाबमध्ये मोठा धक्का बसला आहे. पंजाबकाँग्रेसचे ज्येष्ठ हिंदू नेते सुनील जाखड (Sunil Jakhar) यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी त्यांना दिल्लीत पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व मिळवून दिले. पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपावरुन जाखड यांना सर्व पदांवरून हटवण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली.
Former Cong leader Sunil Jakhar joins BJP, Nadda says 'will play a big role'
— ANI Digital (@ani_digital) May 19, 2022
Read @ANI Story | https://t.co/rqShOjX9Ef#suniljakhar#JPNadda#BJP#PunjabCongress#Punjabpic.twitter.com/kMhaiGmOqW
काँग्रेसशी त्यांचा दीर्घकाळ संबंध होता
जाखड यांचे कुटुंब जवळपास 50 वर्षे काँग्रेसमध्ये राहिले. सध्या त्यांचे तिसर्या पिढीतील पुतणे संदीप जाखड काँग्रेसचे आमदार आहेत.
यावेळी भावूक होऊन सुनील जाखड म्हणाले की, 'माझा गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसशी संबंध होता. मी तीन पिढ्यांपासून काँग्रेसमध्ये राहिलो. धर्म, जात आदी आधारावर पंजाबचे विभाजन करण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यामुळेच हे जुने नाते तोडण्याचा निर्णय घेतला,' अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
भाजपमध्ये सामील होण्याचे कारण सांगितले
सुनील जाखड म्हणाले की, 'संसदेव्यतिरिक्त पंजाबमध्ये मी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. करतारपूर कॉरिडॉरचे उद्घाटन झाले, त्यावेळी पंतप्रधानांच्या जवळ बसून लंगर घालण्याचे भाग्य लाभले. तिथे त्यांच्याशी चांगला संवाद झाला. पंजाबला विशेष राज्याचा दर्जा मिळावा, हे माझे स्वप्न आहे. व्यावहारिकदृष्ट्या पंतप्रधान मोदींनी पंजाबला विशेष दर्जा दिला आहे. पंतप्रधानांनी ज्या पद्धतीने गुरु साहिबांचे प्रकाश पर्व साजरे केले त्यावरून ते सिद्ध झाले,' असेही ते म्हणाले.
जेपी नड्डा यांनी केले स्वागत
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की, सुनील जाखड यांनी आज भाजपचे सदस्यत्व घेऊन पक्षात प्रवेश केला आहे. माझ्या आणि भाजपच्या करोडो कार्यकर्त्यांच्या वतीने मी त्यांचे स्वागत आणि अभिनंदन करतो. पंजाबमध्ये राष्ट्रवादी शक्तींचे पहिले स्थान भाजप घेत असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे राष्ट्रवादी विचार असलेल्या सर्वांनी भाजपमध्ये प्रवेश करून पक्ष मजबूत करणे आवश्यक आहे.
काँग्रेसचा राजीनामा दिला होता
पक्षविरोधी कारवायांमध्ये गुंतल्याच्या आरोपावरून गेल्या महिन्यात काँग्रेसमधील सर्व पदांवरून हटवण्यात आलेले जाखड़ यांनी 14 मे रोजी फेसबुकच्या माध्यमातून 'गुड लक आणि गुडबाय काँग्रेस' असे म्हटले होते. काँग्रेस सोडण्याचा निर्णय जाहीर करताना, त्यांनी दिल्लीत बसलेल्या काही नेत्यांवर, विशेषत: अंबिका सोनी यांच्यावर हल्ला केला होता. जोपर्यंत काँग्रेस अशा नेत्यांपासून मुक्त होत नाही तोपर्यंत ते पंजाबमध्ये आपला जनाधार निर्माण करू शकत नाही, असे ते म्हणाले होते.