सारांश........प˜ा.......

By Admin | Updated: August 3, 2015 22:26 IST2015-08-03T22:26:36+5:302015-08-03T22:26:36+5:30

मोकाट कुत्र्यांच्या उपद्रवाने वडाळावासी हैराण

Summary ........ address ....... | सारांश........प˜ा.......

सारांश........प˜ा.......

काट कुत्र्यांच्या उपद्रवाने वडाळावासी हैराण
वडाळागाव : परिसरात मागील अनेक दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताची महापालिकेकडून मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. वडाळारोडवर कुत्र्यांच्या झुंडीमुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे.

नासर्डी पुलावर खड्डे
वडाळागाव : वडाळा रस्त्यावरील नासर्डी पुलावर तसेच वडाळा कॉर्नरवरील रस्त्यात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे वाहने खड्ड्यांमध्ये आदळून नादुरुस्त होत असून, अपघातांच्या घटनादेखील घडत आहे. रस्त्याची तातडीने दुरुस्तीची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.

वडाळागावात गढूळ पाणीपुरवठा
नाशिक : येथील प्रभाग क्रमांक ३८ मध्ये गेल्या तीन ते चार दिवसांपासून पुन्हा गढूळ पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे. पालिकेचा भौगोलिकदृष्ट्या अत्यंत मोठा असा हा प्रभाग आहे. या प्रभागातील वडाळागाव, जयदीपनगर, मिल्लतनगर, अशोकामार्ग, हॅपी होम कॉलनी आदि परिसरात गढूळ पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

वडाळा चौफुलीवर गतिरोधक हवे
वडाळागाव : डीजीपीनगर-साईनाथनगर कॅनॉल रस्त्यावरील वडाळा चौफुलीवर गतिरोधक टाकण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. डीजीपीनगर व साईनाथनगरकडून येणारी वाहने चौफुलीवरून प्रचंड वेगाने जात असल्याने अपघात घडत आहेत.

गौसिया क ब्रस्तानातील पथदीप बंद
वडाळागाव : येथील गौसिया कब्रस्तानमधील पथदीप बंद पडल्याने रात्री अंधाराचे साम्राज्य पसरते. संध्याकाळनंतर करण्यात येणार्‍या दफनविधीच्या वेळी गैरसोय होते. पथदीपांची दुरुस्ती करून काही नवीन पथदीप बसविण्याची मागणी होत आहे.

बागवानपुर्‍यातील पोलीस चौकी हटणार
नाशिक : बागवानपुरा महात्मा फुले चौकात रस्त्याच्या मधोमध असलेली जुनी पडकी पोलीस चौकी तोडण्याचे पत्र नगरसेवक संजय साबळे यांनी पूर्व विभागीय अधिकार्‍यांना दिले आहे. तसेच पालिकेच्या अधिकार्‍यांचे याबाबतचे पत्र भद्रकाली पोलीस ठाण्याला प्राप्त झाले असून, लवकरच पोलीस आयुक्तालयाची कार्यवाही पूर्ण होऊन अडथळा ठरणारी बंद अवस्थेत असलेली चौकी हटविली जाणार आहे.

शहरातील दुभाजकांभोवती साचली माती
नाशिक : शहरातील बहुतांश रस्त्यांवरील दुभाजकांभोवती माती साचून रिमझिम पावसामुळे चिखल होतो. पावसाच्या पाण्यामुळे माती रस्त्यावर वाहून येत असून, वाहने घसरून अपघात होत आहेत. दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने माती कोरडी झाली असून, मोठ्या वाहनांच्या वाहतुकीमुळे धूळ उडून दुचाकीस्वार, पादचार्‍यांना त्रास होत आहे.

Web Title: Summary ........ address .......

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.