सुमित्रा महाजन यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक २३ फेबु्रवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन

By Admin | Updated: February 18, 2015 23:54 IST2015-02-18T23:54:18+5:302015-02-18T23:54:18+5:30

लोकसभा अध्यक्षांनी

Sumitra Mahajan convenes the all-party meeting on February 23 from the budget session | सुमित्रा महाजन यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक २३ फेबु्रवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन

सुमित्रा महाजन यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक २३ फेबु्रवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन

कसभा अध्यक्षांनी
बोलावली २२ ला बैठक
नवी दिल्ली : संसदेचे आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळीतपणे चालण्यासाठी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी येत्या २२ फेबु्रवारीला विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे़ या अधिवेशनात सहा वटहुकूम विधेयकरूपात पारित करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेबु्रवारीला सुरू होऊन ८ मे रोजी संपेल़ लोकसभाध्यक्षांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला (२२ फेबु्रवारी) सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे़
या अधिवेशनात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आपला पहिला संपूर्ण अर्थसंकल्प सादर करेल़ गतवर्षी मे महिन्यात मोदी सरकार सत्तेत आले होते़ यादरम्यान कोळसा, खाण व खनिज, ई-रिक्षा, भू-संपादन आणि विमा क्षेत्रात एफडीआय अशा वटहुकूमांवरील विधेयके पारित करण्याचे आव्हान सरकारपुढे आहे़ (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Sumitra Mahajan convenes the all-party meeting on February 23 from the budget session