शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

100 रुपयांच्या पैजेसाठी त्याने मारली पूर आलेल्या नदीत उडी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2018 11:12 AM

पैज जिंकण्यासाठी वाट्टेल ते करणारी माणसे आपण पाहिली असतील. अशीच एक घटना...

बल्लभगड (हरयाणा) - पैज जिंकण्यासाठी वाट्टेल ते करणारी माणसे आपण पाहिली असतील. अशीच एक घटना हरयाणातील बल्लभगड परिसरात घडली आहे. येथे केवळ 100 रुपयांच्या पैजेसाठी एका तरुणाने पुरामुळे दुथडी भरून वाहत असलेल्या यमुना नदीमध्ये उडी घेतली. हा तरुण पोहण्यात पटाईत होता. मात्र पाण्याचा प्रवाह वेगात असल्याने तो पाण्यासोबत वाहून गेला. या तरुणाचे नाव राहुल असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, सध्या एनडीआरएफच्या पथकाकडून त्याचा शोध सुरू आहे.बल्लभगड जिल्ह्यातील मोहना गावातील या तरुणाने मंगळवारी संध्याकाळी यमुना नदीत उडी मारली होती. त्यात तो वाहून गेला होता. याआधी या तरुणाने मंगळवारी सकाळी नदीत उडी मारून ती पार केली होती. दरम्यान, संध्याकाळी पुराचे पाणी वाढल्याने ते पाहण्यासाठी गावकरी जमले होते. त्याचवेळी गावातील एका माणसाने जो नदी पार करेल त्याला 100 रुपये देण्यात येतील अशी पैज लावली. त्यावेळी राहुल आणि त्याचा मित्र कृष्णा दोघेही तिथे उपस्थित होते. या दोघांनीही पैज जिंकण्यासाठी पुरामुळे दुथडी भरून वाहत असलेल्या नदीत उडी घेतली. यावेळी काही गावकरी या प्रकाराचे मोबाइलवर व्हिडीओ शूटिंग करत होते. दरम्यान, कृष्णा कसाबसा नदीतून बाहेर आला. मात्र राहुल पाण्याच्या प्रवाहात अडकून वाहून गेला.   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल हा यमुना नदीवर असलेल्या पुलाजवळ ढाबा चालवतो. त्याचा शोध घेण्यासाठी पाणबुडे आणि एनडीआरएफचे पथक शोधमोहीम राबत आहेत. मात्र अद्याप त्याचा शोध लागलेला नाही.  

टॅग्स :riverनदीfloodपूरHaryanaहरयाणा