शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

देशात २६० लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 22:30 IST

उत्तरप्रदेश यंदाही साखर साखर उत्पादनात अव्वल

ठळक मुद्देगेल्यावर्षी देशात ३३० लाख टन साखरेचे उत्पादन : ७० लाख टनांनी होणार घट

पुणे : अतिवृष्टी, गेल्यावर्षीचा दुष्काळ याचा फटका यंदाच्या ऊस गाळप हंगामावर झाला असून, देशातील साखर उत्पादनात यंदा २६० लाख टनांपर्यंत घट होणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ७० लाख टनांनी साखर उत्पादन घटणार असल्याचा अंदाज इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) वर्तविला आहे. गेल्यावर्षी देशात ३३० लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. त्यातील,उत्तरप्रदेशामधे १२० व महाराष्ट्रात १०७ लाख टन साखर उत्पादित झाली होती. यंदा महाराष्ट्र व कर्नाटकातील ऊस गाळप हंगामाला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. महाराष्ट्रातील साखर उत्पादन यंदा निम्म्याने खाली येणार आहे. देशातील ४४६ साखर कारखान्यांनी जानेवारी-२०२० अखेरीस १४१.१२ लाख टन साखर उत्पादित केली आहे. गेल्यावर्षी याच काळामधे ५२० साखर कारखान्यांनी १८५.५९ लाख टन साखरेचे उत्पादन घेतले होते. यंदाच्या हंगामात देशामधे २६० लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. उसाच्या रसापासून आणि बी हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मितीमुळे साडेआठ लाख साखरेची घट होईल. गेल्या वर्षीपेक्षा ७० लाख टनांनी साखर उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे. जानेवारी २०१९च्या तुलनेत यंदा ४४.५ लाख टन साखर उत्पादन घटले आहे. उत्तरप्रदेशमधे यंदाही सर्वाधिक साखर उत्पादित होईल. येथील ११९ साखर कारखान्यांनी ५४.९६ लाख टन साखर ३१ जानेवारी २०२० पर्यंत उत्पादित केली होती. गेल्यावर्षी याच काळामधे ११७ कारखान्यांनी ५२.८६ साख टन साखरेचे उत्पादन घेतले होते. महाराष्ट्रातील १४३ कारखान्यांनी ३४.६४ लाख टन साखर उत्पादित केली आहे. गेल्यावर्षी याच काळामधे महाराष्ट्रात ७१ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. कर्नाटकामधील ६३ कारखान्यांनी २७.९४ लाख टन साखर उत्पादित केली असून, गेल्यावर्षी ३३.७६ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. तमिळनाडूमधे २१ कारखान्यांनी २.०५, गुजरात मधील १५ कारखान्यांनी ४.८७, आंध्रप्रदेश व तेलंगणातील १८ साखर कारखान्यांनी २.३४ लाख टन साखर उत्पादित केली आहे. बिहारमधे ४.२१, उत्तराखंड १.९४, पंजाब ३, हरयाणा २.८०, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधे २.२६ लाख टन साखर उत्पादित झाली आहे. --देशात २६० लाख टन साखर विक्रीचा अंदाजदेशामधे गेल्यावर्षी सुमारे २५५ लाख टन साखर विक्री झाली होती. या वर्षी २६० लाख टन साखरेची देशांतर्गत विक्री होईल, असा अंदाज इस्माने वर्तविला आहे. हंगाम सुरु होण्यापूर्वी देशात आॅक्टोबर २०१९ रोजी १४४.३ लाख टन, तर राज्यात ५४.७ लाख टन साखर शिल्लक होती. त्यामुळे यंदा साखरेच्या उत्पादनात घट झाली तरी, मागणीच्या तुलनेत अधिकच साखर उपलब्ध राहील. 

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीGovernmentसरकारUttar Pradeshउत्तर प्रदेश