शाळेची फी भरण्यासाठी नव्हते पैसे; अडचणींवर मात करत 'तो' झाला IAS, 'असा' होता संघर्षमय प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 13:39 IST2023-01-10T13:38:45+5:302023-01-10T13:39:58+5:30
यूपीएससी परीक्षेत यश मिळवून ते आयएएस झाले आहेत. पण त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. अनेक अडचणींवर मात करत त्यांनी घवघवीत यश संपादन केलं आहे.

शाळेची फी भरण्यासाठी नव्हते पैसे; अडचणींवर मात करत 'तो' झाला IAS, 'असा' होता संघर्षमय प्रवास
प्रचंड मेहनत आणि इच्छाशक्तीच्या बळावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या शक्य करता येतात. परिश्रम आणि जिद्दीने कोणतंही ध्येय गाठता येतं. बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यातील रहिवासी विशाल यांची प्रेरणादायी गोष्ट आता समोर आली आहे. यूपीएससी परीक्षेत यश मिळवून ते आयएएस झाले आहेत. पण त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. अनेक अडचणींवर मात करत त्यांनी घवघवीत यश संपादन केलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यातील विशाल यांना यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत 484 गुण मिळाले आहेत. अधिकारी झाल्यानंतर प्रत्येकजण त्यांचे उदाहरण देत आहे आणि अनेक जण त्यांच्यापासून प्रेरणा घेत आहेत. विशाल यांनी यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे श्रेय खासकरून त्यांचं संपूर्ण कुटुंब आणि शिक्षक हरिशंकर प्रसाद यांना दिलं आहे.
शिक्षक गौरी शंकर यांनी त्यांना कठीण परिस्थितीत खूप मदत केली, त्यांनी विशाल यांच्या शिक्षणाचा खर्च उचलला. आर्थिक विवंचनेमुळे विशालने काम करायला सुरुवात केली तेव्हा त्याला त्यांच्याच घरात ठेवले, नंतर त्याला नोकरी सोडून UPSC ची तयारी करण्यास सांगितले, याचदरम्यान गौरी शंकर यांनीही त्यांना आर्थिक मदत केली. विशाल शाळेची यांच्याकडे फी भरायला देखील पैसे नव्हते.
बहीण खुशबू आणि भाऊ राहुल सांगतात की, ते पहिल्यापासून अभ्यासात खूप हूशार होते. ते रात्रभर जागून अभ्यास करायचे. आम्ही त्यांना जबरदस्तीने झोपायला लावायचो. ते दोन-तीन तासांत उठून पुन्हा अभ्यासाला सुरुवात करायचे. आज त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले आहे. वडिलांचा ब्रेन हॅमरेजमुळे मृत्यू झाला. तेव्हापासून आईने आमची काळजी घेतली आणि आम्हाला शिकवले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"