संघर्षाची यशोगाथा! वडिलांनी मजुरी केली, जमीन विकली; लेकाने कष्टाचे पांग फेडले, झाला अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 18:35 IST2026-03-17T18:34:54+5:302026-03-17T18:35:44+5:30

Tawseef Ahmad Ganie : पुलवामामधून पहिले IAS अधिकारी होण्याचा मान मिळवणाऱ्या तौसीफ अहमद गनी यांची यशोगाथा जिल्ह्यातील तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.

success story of ias Tawseef Ahmad Ganie laborer son becomes pulwama first ias officer father sold land to his education | संघर्षाची यशोगाथा! वडिलांनी मजुरी केली, जमीन विकली; लेकाने कष्टाचे पांग फेडले, झाला अधिकारी

संघर्षाची यशोगाथा! वडिलांनी मजुरी केली, जमीन विकली; लेकाने कष्टाचे पांग फेडले, झाला अधिकारी

पुलवामामधून पहिले IAS अधिकारी होण्याचा मान मिळवणाऱ्या तौसीफ अहमद गनी यांची यशोगाथा जिल्ह्यातील तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. तौसीफ हे पुलवामा येथील पुचल या छोट्याशा गावातील रहिवासी आहेत. त्यांनी देशातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षेत (UPSC) यश संपादन केलं. तौसीफ यांचे वडील मोहम्मद इशाक हे रोजंदारीवर काम करणारे मजूर आहेत. तरीही त्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी कोणतीही कसर सोडली नाही.

वडील मोहम्मद इशाक यांनी अत्यंत कमी वयात काम करायला सुरुवात केली होती. स्वतः कष्ट केल्यामुळे त्यांना शिक्षणाचं महत्त्व नीट माहित होतं. आपल्या मुलाने शिकावं यासाठी त्यांनी आपली जमीनही विकली. तौसीफ यांचं हे यश म्हणजे त्या कष्टकरी पित्याच्या स्वप्नाची पूर्तता आहे, ज्यांनी आपल्या मुलासाठी सर्वस्व पणाला लावलं होतं. यावर्षी जम्मू-काश्मीरमधून या प्रतिष्ठेच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या १७ उमेदवारांपैकी तौसीफ एक आहेत.

तौसीफ यांनी अत्यंत कमी वयातच देशाची सेवा करण्याचं निश्चित केलं होतं. २०२२ मध्ये त्यांनी Veterinary Science विषयात पदवी पूर्ण केली. मात्र, त्यांचं खरं स्वप्न यूपीएससी क्रॅक करण्याचं होतं. कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी या परीक्षेची तयारी सुरू केली होती. पदवीचा अभ्यास सांभाळून यूपीएससीचा अभ्यास करणं सोपं नव्हतं, पण कुटुंबाच्या अपेक्षा आणि वडिलांचा संघर्ष हीच त्यांची खरी ताकद बनली.

२०२२ मध्ये पदवी पूर्ण झाल्यानंतर तौसीफ यांनी पहिल्यांदा यूपीएससीची परीक्षा दिली, पण त्यांना अपयश आलं. २०२४ मध्येही निराशाच हाती लागली. एका क्षणी त्यांचा धीर सुटू लागला होता, पण त्यावेळी त्यांच्या वडिलांनी आणि कुटुंबाने त्यांना खंबीर पाठिंबा दिला. त्यानंतर तौसीफ दिल्लीला गेले आणि तिथे तीन-चार महिने अभ्यास केला. अखेर तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी हे शिखर गाठलं.

विशेष म्हणजे पदवी पूर्ण झाल्यानंतर तौसीफ यांना पुंछ येथे वेटरनरी डॉक्टर म्हणून सरकारी नोकरी मिळाली होती. नोकरी करत असतानाही त्यांनी आपलं आयएएस होण्याचं स्वप्न सोडलं नाही. तिसऱ्या प्रयत्नात उत्तम गुण मिळवले. २८४ व्या 'ऑल इंडिया रँक'सह त्यांना आयएएस कॅडर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दक्षिण काश्मीरमधील एका छोट्याशा गावातून आलेल्या तौसीफ अहमद गनी यांचं हे यश जिद्द, मेहनत आणि संघर्षाचं उत्तम उदाहरण आहे.

Web Title : पुलवामा के तौसीफ अहमद: मजदूर के बेटे ने IAS पास किया, पिता का सपना पूरा।

Web Summary : पुलवामा के एक मजदूर के बेटे तौसीफ अहमद ने IAS बनकर अपने पिता का सपना पूरा किया। कठिनाइयों का सामना करने के बावजूद, तौसीफ ने दृढ़ता से काम किया, शीर्ष रैंक हासिल की और जम्मू और कश्मीर में अनगिनत लोगों को प्रेरित किया।

Web Title : Pulwama's Tauseef Ahmad: Laborer's son cracks IAS, fulfilling father's dream.

Web Summary : Tauseef Ahmad, son of a laborer from Pulwama, achieved his IAS dream after his father sacrificed everything for his education. Despite facing setbacks, Tauseef persevered, securing a top rank and inspiring countless others in Jammu and Kashmir.