नवी दिल्ली: सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांनी स्वयंपाकाच्या गॅसचे 5 किलोचे सिलिंडरही सबसिडी योजनेत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहकांना निवडीचे अधिक स्वातंत्र्य त्यामुळे उपलब्ध होईल.
सध्या स्वयंपाकाच्या गॅसचे सिलिंडर केवळ 14.2 किलो वजनातच उपलब्ध आहे. असे 12 सिलिंडर वर्षाला सबसिडीत मिळतात. त्याची किंमत राजधानी दिल्लीत 417 रुपये आहे. 5किलोचे सिलिंडर दिल्लीत 155 रुपयांना मिळेल. पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी राज्यसभेत सांगितले की, एका वर्षात 5 किलोचे 34 सिलिंडर ग्राहकांना सबसिडीत मिळतील. त्यापुढचे सिलिंडर ग्राहकांना 351 रुपयांत घ्यावे लागेल. नेहमीच्या गॅस एजन्सीवरच ग्राहकांना हे छोटे सिलिंडर उपलब्ध होतील. काही मोजक्या पेट्रोलपंपांवरही छोटे सिलिंडर उपलब्ध करून दिले जातील. मात्र, पेट्रोलपंपावर त्याची किंमत 351 रुपये राहील.
(लोकमत न्यूज नेटवर्क)