शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

काश्मीरमध्ये लष्कराची धडक कारवाई; दिवसभरात पाच दहशतवाद्यांना कंठस्नान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 5:41 PM

काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलांनी आज घडक कारवाई करून दोन वेगवेगळ्या चकमकींमध्ये एकूण पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.

श्रीनगर -  काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलांनी आज घडक कारवाई करून दोन वेगवेगळ्या चकमकींमध्ये एकूण पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. शुक्रवारी सकाळी बारामुला जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ उडालेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. तर दुपारी बारामुला जिल्ह्यातील क्रलहार येथे दहशतवादी आणि लष्कराच्या जवानांमध्ये पुन्हा एकदा चकमक उडाली. या चकमकीत लष्कराने दोन जवानांना कंठस्नान घातले. ठार मागण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. उत्तर काश्मीरमध्ये शुक्रवारी सकाळी नियंत्रण रेषेवर बोनियार येथे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना ठार मारले. या दहशतवाद्यांकडून चार एके-47 आणि चार खाद्यपदार्थांच्या बॅग जप्त करण्यात आल्या.

तर बारामुला जिह्यातील क्रलहार येथे दहशतवादी आणि लष्करामध्ये चकमक उडाली. यावेळी झालेल्या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले. या दहशतवाद्यांकडून एके-201 आणि एक चिनी पिस्तुल जप्त करण्यात आले. 

 

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीTerror Attackदहशतवादी हल्ला