शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
4
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
5
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
6
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
7
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
8
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
9
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
10
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
11
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
12
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
13
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
14
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
15
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
16
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
17
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
18
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
Daily Top 2Weekly Top 5

'स्त्रीधना'वर फक्त पत्नीचाच हक्क, पतीचा अधिकार नाही; उच्च न्यायालयाचा निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 07:50 IST

पत्नी आणि तिच्या नातेवाइकांना जारी केलेले समन आणि फौजदारी खटला रद्द करण्याचे आदेश

प्रयागराज : विवाहित महिला आपल्या 'स्त्रीधना'ची (लग्नाच्या वेळी मिळालेली मालमत्ता) एकमेव आणि पूर्ण मालक असते. तिने स्वतःचे दागिने किंवा पैसे स्वतःबरोबर नेल्यास, तिच्यावर विश्वासघाताचा किंवा चोरीचा गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे.

न्यायमूर्ती चवन प्रकाश यांनी अनामिका तिवारी आणि अन्य चार जणांनी दाखल केलेली याचिका मंजूर करताना खालच्या न्यायालयाने पत्नी आणि तिच्या नातेवाइकांना जारी केलेले समन आणि फौजदारी खटला रद्द करण्याचे आदेश दिले.

काय आहे नेमके प्रकरण? 

याचिकाकर्त्या महिलेचा विवाह एप्रिल २०१२ मध्ये झाला होता. लग्नानंतर तिने पती आणि सासरच्या मंडळींविरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. याला प्रत्युत्तर म्हणून पतीने असा आरोप केला की, सप्टेंबर २०१८ मध्ये त्याची पत्नी व तिच्या माहेरच्या लोकांनी घरात घुसून ६,४०० रुपये रोख, दीड लाख रुपयांचे दागिने आणि घरगुती सामान नेले.

निकालातील महत्त्वाचे मुद्दे 

अलाहाबाद उच्च न्यायालयाने आपल्या निकालात स्पष्ट केले आहे की, पत्नी ही तिच्या 'स्त्रीधना'ची पूर्ण आणि एकमेव मालक असते. लग्नाच्या वेळी मिळालेली कोणतीही मालमत्ता हे केवळ स्त्रीधन असते आणि ती पती-पत्नीची संयुक्त मालमत्ता मानली जाऊ शकत नाही. २ पत्नीला तिच्या इच्छेनुसार या मालमत्ता वापरण्याचा पूर्ण अधिकार आहे. जर एखाद्या संकटकाळात पतीने या मालमत्तेचा वापर केला, तरीही ती मालमत्ता पत्नीचीच राहते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पत्नीने स्वतःचे दागिने किंवा स्त्रीधन स्वतः सोबत नेल्यास, तिच्यावर विश्वासघाताचा किंवा चोरीचा कोणताही फौजदारी गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही, कारण ती स्वतःच त्या मालमत्तेची कायदेशीर मालक असते. 

टॅग्स :Courtन्यायालयmarriageलग्न