सात वर्षानी फालेरो चढले काँग्रेस हाउसची पायरी

By Admin | Updated: October 14, 2014 01:26 IST2014-10-14T01:26:27+5:302014-10-14T01:26:27+5:30

काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष लुईङिान फालेरो सात वर्षानंतर सोमवारी काँग्रेस हाउसची पायरी चढले. फालेरो मंगळवारी पदाची सूत्रे हाती घेताना राजकीय शक्तिप्रदर्शनही करणार आहेत.

Stephanie stepped down to Falero for seven years | सात वर्षानी फालेरो चढले काँग्रेस हाउसची पायरी

सात वर्षानी फालेरो चढले काँग्रेस हाउसची पायरी

पणजी : काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष लुईङिान फालेरो सात वर्षानंतर सोमवारी काँग्रेस हाउसची पायरी चढले. फालेरो मंगळवारी पदाची सूत्रे हाती घेताना राजकीय शक्तिप्रदर्शनही करणार आहेत.
2क्क्7च्या विधानसभा निवडणुकीत फालेरो यांचा नावेली मतदारसंघात पराभव झाला होता. त्यानंतर ते काँग्रेस हाउसमध्ये आले नव्हते. ते अखिल भारतीय स्तरावर पक्षाचे काम करू लागल्यानंतर त्यांना काँग्रेस हाउसमध्ये यावे लागले नव्हते. आता त्यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने त्यांच्या समर्थकांनी सोमवारी काँग्रेस हाउसची पुन्हा नव्याने साफ-सफाई केली. फालेरो मंगळवारी पदाची सूत्रे स्वीकारणार असल्याने या कार्यक्रमासाठी राज्यातून त्यांचे समर्थक येणार आहेत. 

 

Web Title: Stephanie stepped down to Falero for seven years