State governments will provide smartphones to students for online classes; Suggestions from the Union Minister of Education | ऑनलाइन वर्गांसाठी राज्य सरकारे विद्यार्थ्यांना देणार स्मार्टफोन; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या सूचना

ऑनलाइन वर्गांसाठी राज्य सरकारे विद्यार्थ्यांना देणार स्मार्टफोन; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या सूचना

- एस.के. गुप्ता

नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या उद्रेकामुळे शालेय विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण घ्यावे लागत आहे. अशा स्थितीत जे विद्यार्थी स्मार्टफोन खरेदी करण्यास असमर्थ आहेत व त्यामुळे ते आॅनलाइन वर्गांना हजेरी लावू शकत नाहीत, त्यांच्यासाठी राज्य सरकारांनी स्मार्टफोन व योग्य संसाधने उपलब्ध करून द्यावीत, असे सांगण्यात आल्याचे केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी सांगितले आहे.
राजस्थानच्या बांसवाडाचे खा. कनकमल कटारा यांनी याबाबत लोकसभेत प्रश्न विचारला होता. या प्रश्नाच्या उत्तरात पोखरियाल म्हणाले की, गरीब विद्यार्थ्यांना डिजिटल सेवा प्रदान करण्यासाठी राज्य सरकारांनी सर्वेक्षण करून त्यांच्यापर्यंत संसाधने पोहोचवावीत, असे सांगण्यात आले आहे. डिजिटल इंडिया मोहिमेंतर्गत गरीब विद्यार्थ्यांना संसाधनयुक्त बनविण्यासाठी नवीन शिक्षण धोरणातही राज्य सरकारांची भागीदारी महत्त्वाची आहे.
३०० प्रोग्राम विद्यार्थ्यांच्या
टॅबवर केले अपलोड
एनसीईआरटीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले की, ई-पाठशाळा अ‍ॅपवर एनसीईआरटीची संपूर्ण पाठ्यसामग्री उपलब्ध आहे. सरकारच्या सांगण्यावरून मागील वर्षी एनसीईआरटीने ३०० प्रोग्राम विद्यार्थ्यांच्या टॅबवर आॅफलाइन मोडवर अपलोड केलेले आहेत.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: State governments will provide smartphones to students for online classes; Suggestions from the Union Minister of Education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.