राज्य सरकारची 'लाडली बहन योजना', महिलांना मिळणार १००० रुपये महिना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 10:46 AM2023-03-06T10:46:11+5:302023-03-06T10:46:43+5:30

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी महिलांना सशक्त आणि मजबूत बनवण्यासाठी ह्या योजनेची घोषणा केलीय

State government's 'Ladli Behan Yojana', women will get Rs 1000 per month by Madhya pradesh government | राज्य सरकारची 'लाडली बहन योजना', महिलांना मिळणार १००० रुपये महिना

राज्य सरकारची 'लाडली बहन योजना', महिलांना मिळणार १००० रुपये महिना

googlenewsNext

केंद्र आणि राज्य सरकारकडून महिला वर्गासाठी नवनवीन योजना राबवण्यात येत असतात. नुकतेच केंद्र सरकारच्या बजेटमध्येही महिलांसाठी काही विशेष योजना लागू करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये, महिलांसाठी मुदत ठेव रकमची योजनाही लागू करण्यात आलीय. तर, विविध राज्य सरकार वेगवेगळ्या योजना आणतात. आता, मध्य प्रदेश सरकारने महिलांना दरमहा १००० रुपये देण्याची योजना सुरू केलीय. 'लाडली बहन योजना' असं या योजनेचं नाव असून महिलांना घर चालवण्यासाठी आर्थिक मदत मिळणार आहे. 

मध्य प्रदेशचेमुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी महिलांना सशक्त आणि मजबूत बनवण्यासाठी ह्या योजनेची घोषणा केलीय. आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेल्या महिलांसाठी ही योजना सुरू करण्यात येत आहे. त्यानुसार, महिलांना दरमहा १ हजार रुपये रक्कम थेट अकाऊंटवर मिळणार आहे. 

कुणाला मिळेल लाभ

केवळ मध्य प्रदेशच्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल
अर्ज करण्यासाठी महिलांचे वय २३ वर्षांपेक्षा कमी आणि ६० वर्षांपेक्षा अधिक नसावे
शाळा किंवा कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. 
ही विशेष योजना केवळ इतर मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील महिलांसाठीच आहे
१० जूनपासून या योजनेतून थेट बँकेत पैसे जमा होणार आहेत
अर्ज जमा करुन घेण्यासाठी अधिकाऱ्यांची टीम गावोगावी जाईल. 

अर्जासाठी काय लागतील कागदपत्रे

१. आधार कार्ड
२. पासपोर्ट साइज  फोटो
३. बँक खातेची डीटेल्स
४. मोबाइल नंबर
५. रहिवाशी दाखला
६. जन्म दाखला
 

Web Title: State government's 'Ladli Behan Yojana', women will get Rs 1000 per month by Madhya pradesh government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.