राज्य शासनाचे अपील फेटाळले
By Admin | Updated: February 18, 2015 23:54 IST2015-02-18T23:54:07+5:302015-02-18T23:54:07+5:30
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य शासनाचे सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरुद्धचे फौजदारी अपील फेटाळले आहे. २१ ऑक्टोबर २००० रोजी सत्र न्यायालयाने विठ्ठल बालपांडे, प्रवीण बालपांडे, गणेश बालपांडे, गंगाबाई इटनकर, चंद्रकांत झाले यांच्यासह एकूण ११ आरोपींना भादंविच्या कलम ३०२, १२०-ब मधून निर्दोष सोडले होते. याविरुद्ध शासनाने उच्च न्यायालयात अपील केले होते. मृताचे नाव बाळासाहेब अग्ने होते. बाळासाहेब व आरोपी विठ्ठलमध्ये वाद होता. १२ जानेवारी १९९९ रोजी अग्ने यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली. आरोपींनी कट रचून ही हत्या केली ,असे पोलिसांचे म्हणणे होते. आरोपींतर्फे ॲड. चंद्रशेखर जलतारे यांनी बाजू मांडली.

राज्य शासनाचे अपील फेटाळले
न गपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य शासनाचे सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरुद्धचे फौजदारी अपील फेटाळले आहे. २१ ऑक्टोबर २००० रोजी सत्र न्यायालयाने विठ्ठल बालपांडे, प्रवीण बालपांडे, गणेश बालपांडे, गंगाबाई इटनकर, चंद्रकांत झाले यांच्यासह एकूण ११ आरोपींना भादंविच्या कलम ३०२, १२०-ब मधून निर्दोष सोडले होते. याविरुद्ध शासनाने उच्च न्यायालयात अपील केले होते. मृताचे नाव बाळासाहेब अग्ने होते. बाळासाहेब व आरोपी विठ्ठलमध्ये वाद होता. १२ जानेवारी १९९९ रोजी अग्ने यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली. आरोपींनी कट रचून ही हत्या केली ,असे पोलिसांचे म्हणणे होते. आरोपींतर्फे ॲड. चंद्रशेखर जलतारे यांनी बाजू मांडली.