शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
2
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
3
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
4
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
5
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
6
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
7
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
8
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
9
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
10
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
11
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
12
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
13
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
14
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
16
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
17
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
18
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
19
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
20
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."

बाबा विरुद्ध बाबा; आता रामदेव बाबांना 'हे' बाबा देणार टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2018 2:27 PM

जाहिरातींवर 200 कोटी रुपयांचा खर्च करणार

नवी दिल्ली: रामदेव बाबांच्या पतंजलीला आता आर्ट ऑफ लिव्हिंगच्या श्री श्री रवीशंकर यांच्याकडून कडवी टक्कर मिळणार आहे. रवीशंकर यांची एफएमसीजी क्षेत्रातील कंपनी जाहिरातींवर जवळपास 200 कोटी रुपये खर्च करणार आहे. आयुर्वेद आणि हर्बल क्षेत्रात मुसंडी मारण्यासाठी श्री श्री यांच्या ब्रँडची देशभरात 1 हजार दुकानं उघडण्यात येणार आहेत. या उत्पादनांच्या जाहिरातींसाठी कोट्यवधींचा खर्च करण्यात येणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल स्पर्धेवेळी श्री श्री यांच्या कंपनीनं जाहिरातींवर 10 कोटी रुपये खर्च केले होते. श्री श्री तत्त्व नावानं दुकानं सुरू करणाऱ्या श्री श्री आयुर्वेद ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी तेज कटपिटिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता कंपनी वेगाने विस्तार करण्यावर भर देणार आहे. यासाठी अतिशय आक्रमक जाहिरातबाजी केली जाणार आहे. याशिवाय गेल्या काही वर्षांपेक्षा वेगळ्या पद्धतीनं जाहिराती करण्यास प्राधान्य दिलं जाणार आहे. 'यंदाच्या आर्थिक वर्षात 3-4 मोठी जाहिरात अभियान चालवली जाणार आहेत. या जाहिराती वृत्तवाहिन्यांसह मनोरंजन आणि प्रादेशिक वाहिन्यांवरदेखील दाखवल्या जातील. याशिवाय ऑन ग्राऊंड आणि आऊटडोर जाहिरातींनादेखील प्राधान्य देण्यात येणार आहे,' अशी माहिती कटपिटिया यांनी दिली. मात्र त्यांनी जाहिरातींसाठी नेमका किती खर्च केला जाणार, याबद्दलची माहिती दिलेली नाही. मात्र जाहिरात एजन्सींनी दिलेल्या माहितीनुसार श्री श्री तत्त्व जाहिरातींवर जवळपास 200 कोटी रुपये खर्च करणार आहे.  

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाpatanjaliपतंजली