शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

इंग्रजी शाळांनी माध्यम बदलल्यास विशेष अनुदान

By admin | Updated: March 27, 2016 01:16 IST

राज्यातील इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांनी जर माध्यम बदलून मराठी किंवा कोकणी माध्यम स्वीकारल्यास त्या शाळांना प्रत्येक विद्यार्थ्यामागे चारशे रुपये याप्रमाणे विशेष अनुदान

पणजी : राज्यातील इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांनी जर माध्यम बदलून मराठी किंवा कोकणी माध्यम स्वीकारल्यास त्या शाळांना प्रत्येक विद्यार्थ्यामागे चारशे रुपये याप्रमाणे विशेष अनुदान दिले जाणार आहे. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.मुख्यमंत्री म्हणाले की, मातृभाषेतून गोव्यातील मुलांचे प्राथमिक शिक्षण व्हावे म्हणून सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठीच विविध योजना राबविल्या जात आहेत. मातृभाषेतून म्हणजे मराठी किंवा कोकणीतून जर प्राथमिक शिक्षण झाले तर मुलांना विषय शिकणे सोपे जाते. मातृभाषेतून शिक्षण ही शास्त्रोक्त पद्धत आहे. मातृभाषेतून प्राथमिक शिक्षणास प्रोत्साहन मिळावे म्हणून सरकारने साडेतीन वर्षांपूर्वी विद्यालयांना साधनसुविधा निर्माणासाठी बारा लाख रुपयांचे अनुदान जाहीर केले होते. त्याबाबतचे परिपत्रकही जारी झाले होते; पण त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये तांत्रिक अडचणी आल्या. गेल्या अर्र्थसंकल्पात आपण प्रत्येक विद्यार्थ्यामागे चारशे रुपये देण्याची तरतूद जाहीर केली. जी मुले शासकीय अनुदानित शाळांमध्ये मराठी व कोकणी शाळांमध्ये शिकतात अशा प्रत्येक मुलामागे हे चारशे रुपये शाळेला दिले जातील. शाळा मग या पैशांचा वापर सुविधा वाढविण्यास किंवा अन्य गोष्टींसाठीही करू शकेल. त्यासाठी किचकट सोपस्कार पार पाडण्याची गरज नाही. येत्या शैक्षणिक वर्षी ज्यांना शाळा सुरू करायची आहे, त्यांनीही या योजनेचा लाभ घ्यावा. नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास दीड महिन्याचा कालावधी बाकी आहे. या चारशे रुपयांव्यतिरिक्त शिक्षकांसाठी जे वेतनविषयक अनुदान विद्यालयांना दिले जाते, ते सुरूच ठेवले जाईल, असेही पार्सेकर म्हणाले.सध्या ज्या शाळा इंग्रजी माध्यमातून चालतात, त्यांनादेखील इच्छा असल्यास मराठी किंवा कोकणी माध्यम स्वीकारून चारशे रुपये खास अनुदानाचा लाभ मिळविता येईल. आम्ही २५ कोटी रुपयांची अर्र्थसंकल्पीय तरतूद केली आहे. प्राथमिक शाळा सुरू करण्यासाठी एक किलोमीटर अंतराची अट असते; पण मराठी-कोकणी शाळा कुणी सुरू करत असेल तर सरकार अंतराच्या अटीवर जास्त लक्ष देणार नाही, असेही ते म्हणाले. (खास प्रतिनिधी)सध्या ज्या इंग्रजी माध्यमातील शाळांनी मराठी किंवा कोकणी माध्यम स्वीकारून चारशे रुपये खास अनुदानाचा लाभ मिळविता येईल.नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास दीड महिन्याचा कालावधी बाकी आहे. या चारशे रुपयांव्यतिरिक्त शिक्षकांसाठी जे वेतनविषयक अनुदान विद्यालयांना दिले जाते, ते सुरूच ठेवले जाईल