अपघातातून थोडक्यात बचावली सौरव गांगुलीची लेक सना; बसचा पाठलाग करुन चालकाला पकडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 08:50 IST2025-01-04T08:42:22+5:302025-01-04T08:50:17+5:30

माजी कर्णधार सौरव गांगुलीची मुलगी सना गांगुली हिचा शुक्रवारी संध्याकाळी अपघात झाला.

Sourav Ganguly daughter Sana Ganguly car met with an accident hit by a bus | अपघातातून थोडक्यात बचावली सौरव गांगुलीची लेक सना; बसचा पाठलाग करुन चालकाला पकडलं

अपघातातून थोडक्यात बचावली सौरव गांगुलीची लेक सना; बसचा पाठलाग करुन चालकाला पकडलं

Sourav Ganguly Daughter Accident : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची मुलगी सना गांगुली हिचा शुक्रवारी संध्याकाळी कोलकाता येथे मोठा अपघात झाला. डायमंड हार्बर रोडवर बसने सना गांगुलीच्या कारला जोरदार धडक दिली. अपघातावेळी सना कारमध्ये उपस्थित होती आणि तिचा ड्रायव्हर गाडी चालवत होता. धडकेनंतर बसचालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र तो पकडला गेला. सध्या आरोपी चालक पोलिसांच्या ताब्यात आहे. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

बेहाला चौरस्ता भागातील डायमंड हार्बर रोडवर कोलकाता-रायचक मार्गावरील एक्स्प्रेस बसने सना घरातून निघाली असताना तिच्या मर्सिडीज कारला धडक दिली. त्यावेळी सौरव गांगुलीची मुलगी सना गांगुली कारमध्ये उपस्थित होती आणि तिचा ड्रायव्हर कार चालवत होता. बसला धडक देऊन घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर सनाच्या कारने बसचा पाठलाग करून ती साखेर बाजार परिसरात थांबवली. यानंतर बस चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं.

बस थांबल्यानंतर सनाने स्थानिक पोलिसांना फोन केला. माहिती मिळताच बेहाळा पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि बस चालकाला ताब्यात घेऊन बस थांबवली. या धडकेत सनाच्या कारचे किरकोळ नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी सौरव गांगुली किंवा त्याच्या वतीने अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

सना गांगुली ही सौरव गांगुली आणि त्याची पत्नी डोना गांगुली यांची एकुलती एक मुलगी आहे. सनाने तिचे सुरुवातीचे शिक्षण लोरेटो हाऊस, कोलकाता येथून घेतले आणि नंतर युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधून अर्थशास्त्रात पदवी घेतली. सध्या सना गांगुली लंडनस्थित बुटीक सल्लागार कंपनीमध्ये सल्लागार म्हणून काम करत आहे. सनाचा व्यावसायिक अनुभव विविध क्षेत्रात पसरलेला आहे. एनॅक्टस नावाच्या संस्थेसोबत तिने पूर्णवेळ काम केले आहे. याशिवाय तिने प्राइसवॉटरहाऊस कूपर्स आणि डेलॉइट सारख्या नामांकित कंपन्यांमध्येही इंटर्न म्हणून काम केले आहे.
 

Web Title: Sourav Ganguly daughter Sana Ganguly car met with an accident hit by a bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.