शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

झारखंडमध्ये सोरेन सरकारने विश्वास जिंकला; NDA ला २९ मतं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 07:06 IST

सोमवारी विधानसभेत चंपई सोरेन सरकारची बहुमत चाचणी झाली.

एस.पी.सिन्हारांची : झारखंडमध्ये चंपई सोरेन सरकारने सोमवारी विश्वासदर्शक ठराव जिंकला. सरकारच्या बाजूने ४७, तर विरोधात २९ मते पडली. ईडीने जमीन घोटाळ्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केल्यानंतर झारखंड मुक्ती मोर्चाच्या (झामुमो) नेतृत्वाखालील आघाडीने नेतृत्वाची धुरा चंपई सोरेन यांच्याकडे सोपवली होती.

सोमवारी विधानसभेत चंपई सोरेन सरकारची बहुमत चाचणी झाली. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या अभिभाषणानंतर चंपई सोरेन यांनी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला. न्यायालयाकडून आदेश मिळाल्याने हेमंत सोरेन यांनीही बहुमत चाचणीत भाग घेतला. विधानसभेत ४७ आमदारांनी प्रस्तावाच्या बाजूने, तर २९ आमदारांनी विरोधात मतदान केले. अपक्ष आमदार सरयू रॉय यांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला नाही. विधानसभेत मतदानावेळी ७७ आमदार उपस्थित होते.

झारखंडमध्ये ‘ऑपरेशन लोटस’ अयशस्वी : काँग्रेसझारखंड विधानसभेत चंपई सोरेन सरकारने बहुमत सिद्ध केल्यानंतर काँग्रेसने सोमवारी भाजपवर हल्लाबोल केला. भाजपचे ‘ऑपरेशन लोटस’ राज्यात अयशस्वी ठरले असून, यातून जनशक्तीचे सामर्थ्य सिद्ध होते, असे केंद्रातील या प्रमुख  विरोधी पक्षाने म्हटले. 

१२ फेब्रुवारीला याचिकेवर सुनावणीहेमंत सोरेन यांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कारवाईविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर विशेष न्यायालय १२ फेब्रुवारी रोजी सुनावणी करणार आहे. सोरेन यांचे प्रतिनिधित्व करणारे महाधिवक्ता राजीव रंजन यांनी दिली. 

...तर राजकारण आणि झारखंडही सोडणारसोरेन म्हणाले की, ३१ जानेवारीची काळी रात्र, हा काळा अध्याय देशाच्या लोकशाहीशी नव्या पद्धतीने जोडला गेला आहे. याआधी कोणत्याही मुख्यमंत्र्यांना अशा प्रकारे अटक केल्याचे मला माहीत नाही. मला वाटते यात राजभवनाचाही सहभाग आहे. २०२२ पासून अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने ३१ च्या घटनेची संहिता लिहिली जात होती. भाजपने सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आम्ही त्यांचे प्रयत्न यशस्वी होऊ दिले नाहीत. माझ्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध करावेत, आरोप सिद्ध झाले तर मी राजकारण सोडेन. मी केवळ राजकारणातून निवृत्त होणार नाही तर झारखंड सोडेन, असे आव्हान त्यांनी भाजपला दिले.

टॅग्स :JharkhandझारखंडChief Ministerमुख्यमंत्रीElectionनिवडणूक