सोनू सूदची बहीण लढविणार पंजाब विधानसभा निवडणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 07:59 IST2021-11-15T07:57:35+5:302021-11-15T07:59:31+5:30

सोनू सूदने ही ऑफर नाकारली आहे. मात्र, आता त्याची बहीण मालविका सूद सच्चर  पंजाबमध्ये निवडणूक लढवणार आहे.

Sonu Sood's sister to contest Punjab Assembly polls | सोनू सूदची बहीण लढविणार पंजाब विधानसभा निवडणूक

सोनू सूदची बहीण लढविणार पंजाब विधानसभा निवडणूक

चंढीगड - पंजाबमध्ये आगामी वर्षात विधानसभा निवडणुकीच्या बिगूल वाजणार आहे. कोरोना काळात अभिनेता सोनू सूद सध्या गरिबांसाठी ‘मसिहा’ बनला आहे. एकीकडे देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लोक मदतीसाठी सैरावैरा भटकत होते, तर दुसरीकडे अशा लोकांसाठी अभिनेता सोनू सूद अगदी देवदूतासारखा लोकांच्या मदतीसाठी धावून येत आहे. यानंतर काही राजकीय पक्षांकडून सोनू सूदला निवडणूक लढवण्याची ऑफर देण्यात आली होती.

सोनू सूदने ही ऑफर नाकारली आहे. मात्र, आता त्याची बहीण मालविका सूद सच्चर  पंजाबमध्येनिवडणूक लढवणार आहे. मात्र, मालविका कोणत्या पक्षातून, कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार हे अद्याप समोर आलेले नाही. 
 

Web Title: Sonu Sood's sister to contest Punjab Assembly polls