सोनिया गांधी यांना रक्तदाबाचा त्रास; रुग्णालयात चाचण्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 07:19 IST2025-06-08T07:19:24+5:302025-06-08T07:19:37+5:30

Sonia Gandhi Health Update: काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना शनिवारी उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्यानंतर शिमला येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, असे पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

Sonia Gandhi suffers from high blood pressure; tests at hospital | सोनिया गांधी यांना रक्तदाबाचा त्रास; रुग्णालयात चाचण्या

सोनिया गांधी यांना रक्तदाबाचा त्रास; रुग्णालयात चाचण्या

शिमला - काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना शनिवारी उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्यानंतर शिमला येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, असे पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, काही चाचण्या केल्यानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले. सोनिया (७८) कन्या प्रियांका यांच्यासोबत शिमला येथे वैयक्तिक दौऱ्यावर आल्या आहेत.

आयजीएमसीचे उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमन यांनी सांगितले की, सोनिया यांच्या काही चाचण्या करण्यात आल्या आणि नंतर त्या येथून घरी गेल्या. त्यांचा रक्तदाब वाढला होता. परंतु सर्व काही सामान्य होते.

हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार नरेश चौहान यांनी सांगितले की, सोनिया गांधी यांना उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. ही एक नियमित तपासणी होती आणि त्या आता घरी परतल्या आहेत.

 

Web Title: Sonia Gandhi suffers from high blood pressure; tests at hospital