शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

सोनिया गांधींनीही बोलावली महत्त्वाची बैठक, महाविकास आघाडीवर चर्चा? 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 3:39 PM

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी पक्षाच्या सर्वच सरचिटणीस, राज्यांचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्य प्रभारींच बैठक बोलावली आहे. 24 जून रोजी व्हिडिओ कॉन्फरेन्सिंगद्वारे ही बैठक होत आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्रात काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर टीका केली आहे. त्यातच, शरद पवार यांचा दिल्ली दौराही चर्चेचा विषय ठरला आहे.

नवी दिल्ली - शस्त्रक्रियनंतर सक्रिय झालेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सध्या दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवार आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यात एक महत्त्वाची होत असून शरद पवारांच्या निवासस्थानीच विरोधी पक्षातील १५ ते २० बड्या नेत्यांची बैठक होणार आहे. या भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. त्यातच, आता काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही दिल्लीत काँग्रेस नेत्यांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे, देशासह राज्याच्या राजकारणात काहीतरी घडणार, अशी चर्चा जोर धरत आहे.  

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी पक्षाच्या सर्वच सरचिटणीस, राज्यांचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्य प्रभारींच बैठक बोलावली आहे. 24 जून रोजी व्हिडिओ कॉन्फरेन्सिंगद्वारे ही बैठक होत आहे. पंजाब आणि राजस्थानमधील काँग्रेस पक्षातील अंतर्गत कलह, आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील सध्याच्या घडामोडींमुळे या बैठकीला अधिक महत्त्व आहे. राजस्थानमध्ये सचिन पायलट आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यातील शीतयुद्ध काँग्रेससाठी डोकेदुखी ठरत आहे. 

महाराष्ट्रात काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर टीका केली आहे. त्यातच, शरद पवार यांचा दिल्ली दौराही चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे, सोनिया गांधींनी बोलाविलेल्या बैठकीकडे काँग्रेससह देशातील प्रमुख पक्षांचे लक्ष लागले आहे. 

शरद पवारांच्या उपस्थितीत महत्त्वाच बैठक 

शरद पवार यांनी दोन आठवड्यांत दोनदा प्रशांत किशोर यांची भेट घेतली आहे. याआधी मुंबईतील शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर पवार आणि किशोर यांची भेट झाली होती. आता उद्या पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी विरोधी पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांची बैठक होत आहे. या बैठकीला राष्ट्रीय जनता दल, आम आदमी पक्षासह इतर पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. तृणमूलचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी राष्ट्रमंच नावानं एक व्यासपीठ सुरू केलं आहे. याच राष्ट्रमंचाच्या बॅनरखाली उद्या शरद पवार आणि विरोधकांची बैठक होत आहे. या नेत्यांच्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा होईल. यै बैठकीला काँग्रेसचा प्रतिनिधी किंवा नेता उपस्थित राहणार आहे की नाही, याबद्दलची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

यूपीए की तिसरी आघाडी?

शरद पवारांनी काँग्रेसप्रणित यूपीएचं नेतृत्त्व करावं, अशी भूमिका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अनेकदा मांडली आहे. मात्र काँग्रेस याबद्दल फारशी उत्सुक नाही. आता शरद पवारांनी दिल्लीत विरोधकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे पवार तिसरी आघाडी तयार करत आहेत का, अशी चर्चा दिल्लीत सुरू झाली आहे. २०२४ च्या लोकसभेआधी भाजपविरोधात महाआघाडीची गरज असल्याचं विधान काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केलं होतं.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसSharad Pawarशरद पवार