Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 09:36 IST2025-06-09T09:33:10+5:302025-06-09T09:36:01+5:30

Sonam Arrested : राजा रघुवंशीच्या हत्येचे गूढ अखेर उलगडले. जिच्यासोबत राजा हनिमूनला गेला होता, त्या सोनमनेच त्याचा काटा काढल्याचे समोर आले. यात तीन तरुणांनी तिची मदत केली. 

sonam raghuwanshi took the help of three people to kill Raja Raghuvanshi; two arrested, one absconding | Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार

Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार

Raja Raghuvanshi Sonam News: हनिमूनला गेल्यानंतर बेपत्ता झालेल्या राजा रघुवंशी आणि त्याची पत्नी सोनम यांच्या प्रकरणाने धक्कादायक वळण घेतले. राजा रघुवंशीची हत्या सोनमनेच केल्याचे पोलीस तपासातून समोर आले. पोलिसांनी सोनमसह तिघांना अटक केली आहे. तर, एक फरार आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

२८ दिवसांपूर्वी ज्याच्यासोबत सात फेरे घेतले आणि ज्याच्या नावाचे कुंकू लावले. त्यालाच अवघ्या काही दिवसांत संपवले. राजा रघुवंशी हत्या प्रकरणात झालेल्या नव्या खुलाशाने सगळीकडे खळबळ उडाली आहे. 

वाचा >>हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक

सोनम २० मे रोजी राजा रघुवंशीसोबत हनिमूनसाठी इंदौरवरून गेली होती. मेघालयात फिरत असताना २३ मे रोजी अचानक बेपत्ता झाले. त्यानंतर २ जून रोजी राजाचा मृतदेह सापडला आणि प्रकरणातील गुढ वाढले. पण, या सगळ्यामागे सोनमचं मुख्य सूत्रधार निघाली. 

राजाची हत्या करून सोनम झाली होती फरार

शिलाँगमध्ये फिरत असताना सोनम राजाला निर्मनुष्य ठिकाणी घेऊन गेली. त्यावेळी तिच्यासोबत तीन जण होते. तिथे राजाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आणि मृतदेह दरीत टाकण्यात आला. हत्येच्या प्रकरणात आपल्यावर संशय येऊ नये म्हणून सोनमने तिच्या अंगावरील पांढरा शर्ट आणि पर्सही मृतदेहाशेजारीच टाकली होती. २३ मे रोजी राजाची हत्या केल्यापासून ती फरार होती. 

पैसे देऊन बोलावले हत्यारे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनमने राजाची हत्या करण्यासाठी पैसे दिले होते. तीन जणांना पैसे देऊन शिलाँगमध्ये नेले होते. त्यांच्या मदतीनेच तिने राजाची हत्या केली. पोलिसांनी उत्तर प्रदेशातील गाजीपूर येथे सोनमला अटक केली. त्याचबरोबर या हत्या प्रकरणात सहभाग असलेल्या तिघांपैकी दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. एक जण फरार आहे. 
 
राजा रघुवंशी आणि सोनमचे ११ मे रोजी इंदौरमध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर नऊ दिवसांनी म्हणजे २० मे रोजी ते मेघालयात पोहोचले. २३ मे रोजी ते शिलाँगमधील नोंग्रियाट गावातील डबल डेकर लिव्हिंग रुट पूल बघण्यासाठी गेले होते. त्यानंतर बेपत्ता झाले. २४ मे रोजी त्यांनी फिरण्यासाठी भाड्याने घेतलेली स्कूटर पोलिसांना सापडली होती. 

Web Title: sonam raghuwanshi took the help of three people to kill Raja Raghuvanshi; two arrested, one absconding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.