शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

Sonam Raghuvanshi : सोनमपर्यंत पोहोचवणारे धागेदोरे, पोलिसांनी कसं उलगडलं राजाच्या हत्येचं गूढ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 13:14 IST

सोनम रघुवंशी सापडली आणि तिने दिलेला कबुली जबाब ऐकून सगळेच हादरून गेले. या प्रकरणाचं गूढ उकलण्यात अखेर पोलिसांना यश मिळालं आहे.

मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये राहणारे राजा आणि सोनम रघुवंशी आपल्या दाम्पत्य जीवनाची गोड सुरुवात करण्यासाठी मेघालयला गेले होते. मात्र, या ठिकाणी दोघेही बेपत्ता झाले. नंतर युद्धपातळीवर त्यांचा शोध घेतला जात होता. दरम्यान राजाचा मृतदेह सापडला आणि खळबळ उडाली. त्यानंतर, सोनम सापडली आणि तिने दिलेला कबुली जबाब ऐकून सगळेच हादरून गेले. या प्रकरणाचं गूढ उकलण्यात अखेर पोलिसांना यश मिळालं आहे.

कधी झाली घटनेची सुरुवात?

इंदूर येथील नवविवाहित जोडपे राजा आणि सोनम रघुवंशी मेघालयमधील शिलाँगमध्ये हनिमूनसाठी पोहोचले होते. परंतु, २३ मे रोजी चेरापुंजीच्या नोंगरियाट गावातील 'लिव्हिंग रूट ब्रिज'ला भेट दिल्यानंतर ते दोघे अचानक बेपत्ता झाले. या प्रकरणात त्यांना शोधण्यासाठी पोलीस तापस सुरू झाला. आणि वेगवेगळ्या घटनांमधून पोलिसांना महत्त्वाचे पुरावे मिळत गेले.

पोलिसांना मिळालेले धागेदोरे

राजा आणि सोनम यांचे लग्न ११ मे २०२५ रोजी इंदूरमध्ये झाले होते. त्यांच्या हनिमूनची सुरूवात २० मे रोजी मेघालयातील शिलाँगमध्ये झाली. मात्र, त्याच्या नंतरच्या तीन दिवसांमध्ये त्यांची अपहरण व हत्या झाली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सीसीटीव्ही फुटेज, सापडलेली वस्तू आणि हत्येचा संशय!पोलिसांना सगळ्यात आधी राजा आणि सोनम यांचे शिलाँगमधील एका होमस्टेमध्ये २१ मे रोजी चेक-इन करतानाचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले. यानंतर त्यांना राजाच्या मृतदेहाजवळ काही महत्त्वाच्या वस्तू मिळाल्या, ज्यामध्ये एक पांढरा शर्ट, औषधांची पाकीटं, स्मार्टवॉच आणि तुटलेली मोबाईल स्क्रीन यांचा समावेश होता. राजाचा सोन्याचा चेन, अंगठी आणि पाकीट गायब होते, ज्यामुळे दरोड्याचा संशय व्यक्त झाला.

गूढ उलगडताना बांगलादेश सीमेशी संबंधत्यांच्या स्कूटीचे लोकेशन बांगलादेश सीमेजवळ आढळल्याने या प्रकरणात एक नवे वळण आले. राजाचा भाऊ विपिन याने असा दावा केला की, या भागात पर्यटकांना लक्ष्य करणारी एक टोळी आहे जी पुरुषांना मारते आणि महिलांचे अपहरण करते. या दृष्टीकोनामुळे मानवी तस्करीच्या सिद्धांताला जोर मिळाला होता.

धक्कादायक खुलासा, सोनमच झाली बेवफा!१७ दिवसांच्या बेपत्ता नाट्यानंतर, ८ जून २०२५ रोजी सोनम गाझीपूर, उत्तर प्रदेश येथील एका ढाब्यावर दिसली. तिने पोलिसांसमोर आत्मसमर्पण करत खुलासा केला की, पती राजा रघुवंशीचा खून करण्यासाठी तिनेच भाडोत्री गुंड ठेवले होते. पोलिसांनी तिला आणि तिच्या साथीदारांना अटक केली. सोनम आणि अन्य तीन आरोपींना सध्या ताब्यात घेतले आहे.

साक्षीदारांचा महत्त्वाचा रोलगाईड अल्बर्ट पीडी यांनी २३ मे रोजी सकाळी १० वाजता राजा आणि सोनमला तीन पुरूषांसह ३००० पायऱ्या चढताना पाहिले होते. ही महत्त्वाची साक्ष पोलिसांना गुन्ह्याच्या तपासात मदत करणारी ठरली. सोनमचे दुसऱ्या तरूणावर प्रेम असल्याने तिने हे कृत्य केल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी