दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 19:22 IST2025-07-25T19:19:26+5:302025-07-25T19:22:19+5:30
Uttar Pradesh Crime News: दोन रुग्णवाहिका आणि एका व्हॅनमधून २०-२५ माणसं भरून आणून एका जावयाने सासरवाडीमध्ये तुफान राडा केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील बाराबंकी जिल्ह्यात एक अजब घटना घडली आहे. लग्नानंतर महिनाभरातच या जावयाने त्याचं सासर असलेल्या रसौली गावात माणसं आणून सासरच्या मंडळींवर हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे.

दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
दोन रुग्णवाहिका आणि एका व्हॅनमधून २०-२५ माणसं भरून आणून एका जावयाने सासरवाडीमध्ये तुफान राडा केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील बाराबंकी जिल्ह्यात एक अजब घटना घडली आहे. लग्नानंतर महिनाभरातच या जावयाने त्याचं सासर असलेल्या रसौली गावात माणसं आणून सासरच्या मंडळींवर हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेत सुमारे १० जण जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जावयाने सासरच्या मंडळींवर केलेल्या या हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यामध्ये गावात आलेली रुग्णवाहिका आणि दोन्ही बाजूंच्या लोकांमध्ये होत असलेली हाणामारी दिसत आहे.
या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार गावात घुसलेल्या रुग्णवाहिका आणि व्हॅन पाहून लोकांना सुरुवातीला काही समजले नाही. त्यानंतर या वाहनांमधून उतरलेल्या तरुणांनी लाठ्याकाठ्या, लोखंडी चेन आणि धारदार हत्यारांद्वारे सासरच्या मंडळींवर हल्ला चढवला. यात दोन्ही बाजूचे मिळून १० जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी ६ जणांची प्रकृती गंभीर आहे.
या घटनेत जखमी झालेल्या नईमा बानो यांनी सांगितले की, माझी मुलगी झोया हिचं लग्न २० जून रोजी लखनौमधील मोहम्मद दानिश याच्यासोबत लावून दिलं होतं. तर या घटनेत जखमी झालेल्या झुबेर याने सांगितले की, दानिश हा तीन रुग्णवाहिका आणि एका व्हॅनमध्ये २० ते २५ जणांना भरून घेऊन आला. या सर्वांकडे लाठ्याकाठ्या, धारदार हत्यारे होती. इथे येताच त्याने कोण अडवतो ते पाहू असं आव्हान दिलं आणि मारहाण सुरू केली. यादरम्यान, मध्ये पडण्याचा प्रयत्न करणाऱ्या ग्रामस्थांनाही बेदम मारहाण केली गेली. मोहम्मद दानिश हा गावच्या गल्लीबोळातून सुसाट गाडी चालवायचा. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये त्याच्याबाबत रोष होता. मात्र त्याला अडवले तर मला कोण अडवतो ते बघतो, अशी धमकी द्यायचा.
दरम्यान, या हाणामारीत दानिश हासुद्धा जखमी झाला असून, त्याने ग्रामस्थांवर उलट आरोप केला आहे. गावातील काही तरुण माझी मेहुणी आमि इतर बहिणींची छेड काढायचे. मी मित्रांसोबत त्यांना समजावण्यासाठी आलो असता, त्यांनी माझ्यावरच हल्ला केला. असा आरोप त्याने केला.