शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

सोमनाथ भारतींना केव्हाही अटक

By admin | Updated: September 22, 2015 22:40 IST

आम आदमी पार्टीचे आमदार सोमनाथ भारती यांच्याविरुद्ध त्यांच्या पत्नीने कौटुंबिक हिंसाचार आणि हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपात दाखल केलेल्या प्रकरणात भारती यांना अंतरिम

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे आमदार सोमनाथ भारती यांच्याविरुद्ध त्यांच्या पत्नीने कौटुंबिक हिंसाचार आणि हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपात दाखल केलेल्या प्रकरणात भारती यांना अंतरिम जामीन देण्यास उच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिल्याने त्यांना कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी त्यांचा शोधही सुरू केला आहे. दरम्यान, भारती सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याची माहिती त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली.भारती यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर लगेच पोलीस कामाला लागले. त्यांचे कार्यालय व निवासस्थानी धाडी घातल्या, परंतु भारतींचा थांगपत्ता लागला नाही. भारती यांनी आपला फोनही बंद ठेवला आहे, असे पोलिसांनी सांगितले. तत्पूर्वी न्यायालयाने भारती यांची याचिका फेटाळली. भारती यांच्या अटकेची शक्यता असली तरी आणखी काही कायदेशीर पर्याय खुले असल्याचे त्यांच्या वकिलांनी स्पष्ट केले. उच्च न्यायालयाने गेल्या १७ सप्टेंबरला न्यायालयाचा आदेश येईपर्यंत भारती यांना अटकेपासून दिलासा देताना आपला आदेश राखून ठेवला होता. सोबतच रात्री उशिरा पोलीस ठाण्यात गेल्याबद्दल भारती यांना कडक शब्दात फटकारले होते. त्यांना पोलीस ठाण्यात जाणे एवढे आवडत असेल तर मीच त्यांना येथून पाठवेल, असे न्यायालयाने म्हटले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)