नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 16:43 IST2025-04-22T16:43:07+5:302025-04-22T16:43:32+5:30

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, आज सौदी अरेबियामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जंगी स्वागत करण्यात आलं.

Something happened as soon as Narendra Modi's plane entered Saudi Arabian airspace, leaving everyone speechless | नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्

नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, आज सौदी अरेबियामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विमान एअर इंडिया वन हे सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीमध्ये प्रवाश करताच त्यांच्या विमानाला सौदी अरेबियाच्या हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी एअर स्कॉट देत त्यांचं स्वागत केलं.

सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिंस आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान यांनी दिलेल्या निमंत्रणाचा स्वीकार करत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सौदी अरेबियाच्या दोन दिवसीय दौऱ्यावर गेले आहेत. भारत आणि सौदी अरेबियामधील सामरिक भागीदारीच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा खूप महत्त्वपूर्ण मानला जात आहे. संरक्षण आर्थिक क्षेत्रातील भागीदारीबाबत या दौऱ्यामधून चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दौऱ्यात अनेक महत्त्वपूर्ण करारांवर सह्या होण्याची शक्यता आहे.

सौदी अरेबियाच्या दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीस समुदायाच्या लोकांन भेटणार आहेत. तसेच सौदीचे क्राऊन प्रिंस आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीतही भाग घेणार आहेत.   

Web Title: Something happened as soon as Narendra Modi's plane entered Saudi Arabian airspace, leaving everyone speechless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.