शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी पुलाच्या स्लॅबचा काही भाग कोसळला

By admin | Updated: June 25, 2015 23:51 IST

पुणे : शिवाजी पुलाच्या कमानीखालील स्लॅबचा भाग बुधवारी दुपारी दोनच्या दरम्यान अचानक कोसळला. या दुर्घटनेमध्ये पुलाखालून जाणा-या मोटारीचे गाडीचे चेपल्याने नुकसान झाले. ड्रायव्हर किरकोळ जखमी झाला.पुलास कोणताही धोका नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. या पुलाच्या पालिका भवनाजवळील कमानीखाली पाण्याची गळती होत असल्याने दहा वर्षांपुर्वी स्लॅबचे प्लास्टरिंग करण्यात आले आहे. ...


पुणे : शिवाजी पुलाच्या कमानीखालील स्लॅबचा भाग बुधवारी दुपारी दोनच्या दरम्यान अचानक कोसळला. या दुर्घटनेमध्ये पुलाखालून जाणा-या मोटारीचे गाडीचे चेपल्याने नुकसान झाले. ड्रायव्हर किरकोळ जखमी झाला.पुलास कोणताही धोका नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.
या पुलाच्या पालिका भवनाजवळील कमानीखाली पाण्याची गळती होत असल्याने दहा वर्षांपुर्वी स्लॅबचे प्लास्टरिंग करण्यात आले आहे. या प्लास्टरचा काही भाग आज दुपारी कोसळला.नागरिकांनी अग्निशामक दलास याबाबत माहिती कळविल्यानंतर तब्बल दीड तासाने घरपडी विभागाचा एक बंब घटनास्थळी आला. पुलाचा काही भाग पडल्याची माहिती वेगाने पसरुन नागरिक घटनास्थळी येत होते.
या घटनेसंदर्भात महापालिकेचे मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला म्हण़ाले, स्लॅबचा भाग आज अचानक दुपारी कोसळला. या घटनेमध्ये पुलाखालून जाणा-या एका गाडीचे नुकसान झाले असून या गाडीचा ड्रायव्हर किरकोळ जखमी झाला. पालिका प्रशासनाकडून शहरातील सर्व पुलांचे स्ट्रˆरल ऑडीट करण्यात आले आहे. यामध्ये ११ जुन्या पुलांचा समावेश आहे. शिवाजी पुलाची गळती रोखण्यासाठी ग्रेनाईट आणि स्लॅबचा थर लावण्यात आला होता, परंतू त्यामध्ये पाणी गेल्याने स्लॅबचा काही भाग अचानक खाली आला. सुदैवाने कोणताही जिवीतहानी झालेली नाही. सुरक्षेचा उपाय म्हणून पुलाखालील सर्व स्लॅब काढून घेण्यात आले आहेत. अ
चौकट
पुलाचे आयुष्य संपल्याचे पत्र बेदखल
शिवाजी पुलास नवा पूल असे संबोधन आहे.त्यास लवकरच शताब्दी पूर्ण होईल. ब्रिटन सरकारकडून शहरातील काही पुलांचे आयुष्य संपले असून ते तातडीने पाडावेत, असे लेखी पत्र पाठविण्यात आले होते. परंतू, त्या पत्राची दखल महानगरपालिकेकडून गांभीर्याने घेतली गेली नाही. वृत्तपत्रांतून या पुलाच्या जुनाटपणाविषयी बातम्या प्रसिध्द झाल्यानंतर या पुलाजवळ दुस-याच वर्षात एका पुलाचे काम सुरु करण्यात आले. नंतर त्यास जयवंतराव टिळक पूल असे नाव दिले गेले.