Chhattisgarh Naxal Attack : ...अन् नक्षवाद्यांनी ताब्यात घेतलेल्या जवानाची १०० तासांनी सुटका झाली; वाचा इनसाईड स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 01:20 PM2021-04-10T13:20:35+5:302021-04-10T13:33:24+5:30

राज्य सरकार चर्चेसाठी मध्यस्थ करणार असल्याचं जाहीर केल्यानंतरच सीआरपीएफ कमांडो राकेश्वर सिंग (rakeshwar singh) यांना सोडण्यात येणार असल्याचे नक्षलवाद्यांनी सांगितले होते.

soldiers Rakeshwar Singh released by Naxals due to team sent by Chhattisgarh government for mediation | Chhattisgarh Naxal Attack : ...अन् नक्षवाद्यांनी ताब्यात घेतलेल्या जवानाची १०० तासांनी सुटका झाली; वाचा इनसाईड स्टोरी

Chhattisgarh Naxal Attack : ...अन् नक्षवाद्यांनी ताब्यात घेतलेल्या जवानाची १०० तासांनी सुटका झाली; वाचा इनसाईड स्टोरी

Next

बीजापूर: 3 एप्रिल रोजी छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये सीआरपीएफच्या जवानांची नक्षलवाद्यांशी चकमक झाली. यामध्ये 22 सैनिक शहीद झाले आणि नक्षलवाद्यांनी सीआरपीएफचे जवान राकेश्वर सिंग मनहास यांचे अपहरण केले होते. त्यानंतर नक्षलवाद्यांनी राकेश्वर यांची तब्बल 100 तासांनी सुटका केली. राज्य सरकार चर्चेसाठी मध्यस्थ करणार असल्याचं जाहीर केल्यानंतरच सीआरपीएफ कमांडो राकेश्वर यांना सोडण्यात येणार असल्याचे नक्षलवाद्यांनी सांगितले होते. मात्र राकेश्वर यांच्या सुटकेमागील रहस्य छत्तीसगड सरकारने सांगितले आहे. (soldiers Rakeshwar Singh released by Naxals due to team sent by Chhattisgarh government for mediation)

छत्तीसगडमधील एका अधिकाऱ्याने याबद्दल माहिती देताना सांगितले की, आदिवासी समुदायाच्या एका व्यक्तीसोबत दोन प्रतिष्ठित लोकांच्या टीमसह गावातील अनेक लोकांच्या उपस्थितील जवान राकेश्वर यांना नक्षलवाद्यांनी सोडले. छत्तीसगड सरकारने जी टीम पाठवली होती. त्यामध्ये एका 91 वर्षांच्या व्यक्तीचा देखील समावेश होता. तसेच ही व्यक्ती स्वातंत्र सेनानी होते आणि त्यांना पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं आहे.

एका वृत्तावाहिनीने दिलेल्या वृत्तानूसार या व्यक्तीचे नाव धरमपाल सैनी असं आहे. धरमपाल सैनी एक समाजसेवकसुद्धा आहेत आणि त्या भागातील मुलींना ते शिक्षण देण्याचे काम करतात. याव्यतिरिक्त सरकारकडून मध्यस्थीसाठी पाठवलेल्या टीममध्ये गोंडवाना समाजाचे अध्यक्ष तेलम बोरैया, 7 पत्रकार आणि दोन अधिकाऱ्यांचासुद्धा समावेश आहे. या टीमच्या मध्यस्थीनंतर नक्षलवाद्यांनी राकेश्वर यांची 100 तासांनी सुटका केली. 

राकेश्वर यांचे अपहरण केल्यानंतर बस्तर येथील एकापत्रकाराला फोनवरुन नक्षलवाद्यांनी जवान आमच्या ताब्यात असल्याचे कळवले होते.तेव्हापासून जवानाची सुटका होईपर्यंत येथील बहाद्दर पत्रकाराने मोलाची भूमिका बजावली आहे. विशेष म्हणजे जवानाच्या सुटेकसाठी स्वत: पत्रकार नक्षलावाद्यांच्या छावणीत गेले होते, अशी माहिती समोर आली. नक्षलवांद्यांच्या तावडीतील जवानाला सुखरुप कॅम्पमध्ये पोहोचविण्याचं काम बस्तर येथील स्थानिक पत्रकारांनी देखील केलं आहे. त्यामध्ये, बस्तर का पत्रकार नावाने ओळखला जाणार मुकेश चंद्रकर याने मोलाची भूमिका बजावली.

मुकेश यांच्यासह त्यांचे काही सहकारी मित्र नक्षलवाद्यांच्या छावणीत गेले होते. तेथे, गेल्यानंतर नलक्षवाद्याच्या म्होरक्याशी संवाद साधून त्यांनी राकेश्वर यांची सुटका केली. त्यानंतर, आपल्या स्वत:च्या दुचाकीवरुन राकेश्वर सिंह यांना सुखरुप कॅम्पमध्ये पोहोचविण्यात आले. बहाद्दर पत्रकार मुकेश चंद्रकर यांच्या या कामगिरीचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे.  

नेमकं काय घडलं?

  •  2 एप्रिल रोजी CoBRA, CRPF, STF और DRG ने एक संयुक्त ऑपरेशन हाती घेतलं.
  •  तर्रेम, उसूर, पामेड आणि मनिपा (सुकमा) आणि नरसापूरम (सुकमा) येथून सुरक्षा दलाचे जवान या ऑपरेशनमध्ये सहभागी झाले.
  • सुरक्षा दलाला माओवादी एकत्र जमणार असल्याची माहिती मिळाली. त्याच आधारे हे ऑपरेशन हाती घेण्यात आले.
  • 3 एप्रिल रोजी दुपारी सुकमा-बीजापूर बॉर्डवर जोनागुडा गावाजवळ माओवाद्यांनी अचानक हल्ला केला.
  • ही चकमक जिथे झाली तिथून सुरक्षा दलाचे तर्रेम शिबीर अवघ्या 15 किलोमीटरच्या अंतरावर आहे.
  • नक्षलवाद्यांनी पाळत ठेवून हा हल्ला केला होता. 2010मध्ये ताडमेतला येथे आणि 2020मध्ये मिनपा येथे झालेल्या हल्ल्यासारखाच हा हल्ला होता.
  • हा ठरवून घेतलेला निर्णय होता. आम्ही माओवाद्यांच्या बालेकिल्ल्यात होतो. आम्ही पूर्ण तयारीनिशी गेलो होतो. ही मोठी लढाई होती, ती निकराने लढल्या गेली, असं या अभियानाशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितलं.
  • माओवाद्यांच्या पीएलजीए बटालियन नंबर-1चं नेतृत्व कमांडर हिडमा करत होता. याच बटालियनने जवानांवर हल्ला केला. त्यात एकूण 180 नक्षलवादी होते. पामेड एरिया कमिटीचे नक्षलवादी पलटन, कोंटा एरिया कमिटी, जगरगुंडा आणि बासागुडा एरिया कमिटीचीही त्यांना साथ मिळाली होती. त्यामुळे या नक्षलवाद्यांची एकूण संख्या 250 झाली आहे.
  • सुरक्षा दलाचे जवान मात्र दोन किलोमीटरच्या परिसरात घेरले गेले होते. तसेच सर्व जवान एकत्र नव्हते. ही चकमक सुमारे 5 ते 6 तास चालली. म्हणजे शनिवारी 4 वाजल्यापर्यंत सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये प्रचंड धुमश्चक्री उडाली.
  • या हल्ल्यात 9 नक्षलवादी मारले गेले आणि 12 नक्षलवादी जखमी झाल्याचा सुरक्षा दलाचा दावा आहे.
  • एका नक्षलवादी महिलेचा मृतदेहही सापडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या चकमकीत नक्षलवाद्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

Web Title: soldiers Rakeshwar Singh released by Naxals due to team sent by Chhattisgarh government for mediation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.