शहरं
Join us  
Trending Stories
1
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
2
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
5
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
6
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
7
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
8
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
9
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
10
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
11
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
12
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
13
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
14
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

....म्हणून पवारांनी राहुल गांधीच्या इफ्तार पार्टीला मारली दांडी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2018 9:17 AM

मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित नव्हते

नवी दिल्ली - विरोधी पक्षांना एक करणे व मुस्लिम मतदातारांना आपलेसे करण्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आयोजित केलेल्या रोजा-इफ्तारमध्ये माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील तथा माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्यासह जवळपास सगळेच विरोधी पक्षनेते उपस्थित होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित नव्हते. इफ्तार पार्टीला राष्ट्रवादी काँग्रेसकडून डी.पी.त्रिपाठीयांनी हजेरी लावली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले होते. मात्र शरद पवार उपस्थित न रहाण्याचे दुसरेच कारण आहे. 

शरद पवार यांना मुंबईत होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. शरद पवार हे रसिक आहेत, वाचन, नाटक हे त्यांच्या जिव्हाळ्याच्या गोष्टी आहेत. पवारांनी या कार्यक्रमाचं निमंत्रणही आधीच स्वीकारलं होतं. यामुळे दिल्लीतील इफ्तार पार्टीला न जाता त्यांनी मराठी नाट्य संमेलनाला आवर्जून हजेरी लावली.

काँग्रेसने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन, राष्ट्रीय जनता दलाचे मनोज झा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डी. पी. त्रिपाठी, तृणमूल काँग्रेसचे दिनेश त्रिवेदी, सर्व भारतीय संयुक्त गणतांत्रिक मोर्चाचे (आसम) अजमल बदरुद्दीन, बहुजन समाज पक्षाचे सतीश मिश्रा, मार्क्सवादी पक्षाचे सीताराम येचुरी, जनता दलाचे (धर्मनिरपेक्ष) दानिश अली, द्रमुकच्या कनिमोझी आणि शरद यादव यांच्यासह इतरही नेते उपस्थित होते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSharad Pawarशरद पवारcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस