...तर ब्रिटनबाबतही बरोबरीची कारवाई करू, कोविन प्रमाणपत्राबाबत भारताची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2021 14:15 IST2021-09-24T14:15:34+5:302021-09-24T14:15:47+5:30
आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले की, आगामी ४ ऑक्टोबर रोजी लागू होणाऱ्या ब्रिटनच्या धोरणाबाबत चर्चा सुरु आहे. त्यावर लवकरच तोडगा निघेल. ब्रिटनने भारतात बनलेल्या कोविशिल्ड लसीला मान्यता तर दिली आहे. पण, कोविन ॲपच्या माध्यमातून जारी होणारे लसीकरण प्रमाणपत्र नाकारले आहे.

...तर ब्रिटनबाबतही बरोबरीची कारवाई करू, कोविन प्रमाणपत्राबाबत भारताची भूमिका
नितीन अग्रवाल -
नवी दिल्ली : ब्रिटनने कोविन ॲपचे लसीकरण प्रमाणपत्र नाकारल्याच्या धोरणावर तोडगा निघाला नाही तर भारतात येणाऱ्या ब्रिटिश नागरिकांना अशाच व्यवहाराचा सामना करावा लागू शकतो. ब्रिटनची कारवाई भेदभावाची असल्याचे सांगत केंद्र सरकारने स्पष्ट केले की, भारतही बरोबरीची कारवाई करण्यासाठी स्वतंत्र आहे.