शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

म्हणून, काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी NSA अजित डोवाल यांच्या मुलाची मागितली माफी

By बाळकृष्ण परब | Published: December 19, 2020 3:47 PM

Jairam Ramesh apologized : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेल्या जयराम रमेश यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा मुलगा विवेक डोभाल यांची माफी मागितली आहे.

ठळक मुद्देविवेक डोवाल यांनी एक वक्तव्य आणि लेखावरून जयराम रमेश आणि कारवां या नियतकालिकाविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता माफी मागताना जयराम रमेश यांनी सांगितले की, निवडणुकीच्या वेळी रागाच्या भरात विवेक डोवाल यांच्यावर आपण आरोप केले होते. मी याबाबतच्या सत्यता पडताळून पाहिली पाहिजे होतीरमेश यांचा लेख प्रसिद्ध करणाऱ्या कारवां या नियतकालिकावरील मानहानीचा खटला सुरूच राहणार आहे

नवी दिल्ली - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेल्या जयराम रमेश यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा मुलगा विवेक डोभाल यांची माफी मागितली आहे. विवेक डोवाल यांनी एक वक्तव्य आणि लेखावरून जयराम रमेश आणि कारवां या नियतकालिकाविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. दरम्यान फौजदारी मानहानीच्या खटल्यात माफी मागताना जयराम रमेश यांनी सांगितले की, निवडणुकीच्या वेळी रागाच्या भरात विवेक डोवाल यांच्यावर आपण आरोप केले होते. मी याबाबतच्या सत्यता पडताळून पाहिली पाहिजे होती.मी विवेक डोवाल यांच्याविरोधात विधाने केली होती. मी निवडणुकीच्या काळात रागाच्या भारात त्यांच्यावर अनेक आरोप केले होते. मी या आरोपांबाबत शहानिशा करणे गरजेचे होते, असे रमेश यांनी सांगितले. या प्रकरणाबाबत विवेक डोवाल यांनी सांगितले की, जयराम रमेश यांनी या प्रकरणात माफी मागितली आहे. आम्ही तिचा स्वीकारही केला आहे. मात्र रमेश यांचा लेख प्रसिद्ध करणाऱ्या कारवां या नियतकालिकावरील मानहानीचा खटला सुरूच राहणार आहे.विवेक डोवाल यांनी कारवां नियतकालिक आणि जयराम रमेश यांच्याविरोधात मानहानी करणारा लेख प्रकाशित केल्याबद्दत तक्रार दाखल केली होती. विवेक डोवाल हे एक परकीय गुंतवणूक असलेली कंपनी चालवत आहेत तसेच तिचे प्रमोटर हे संशयास्पद पार्श्वभूमी असलेले आहेत, असा दावा लेखातून करण्यात आला होता.तर कारवां नावाच्या नियतकालिकाने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि त्यांच्या कुटुंबावर अनेक आरोप केले होते. अजित डोवाल यांचा मुलगा विवेक डोवाल यांचा केमेन आयलँडवर एक हेज फंड आहे. तसेच हा हेज फंड २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीी नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर केवळ १३ दिवसांनी नोंद करण्यात आला होता, असा दावा या लेखात करण्यात आला होता.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसAjit Dovalअजित डोवाल