काश्मीरच्या गुरेझ सेक्टरमध्ये हिमकडा कोसळला, सहा जवान बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 16:28 IST2017-12-12T12:29:01+5:302017-12-12T16:28:41+5:30

जम्मू-काश्मीरच्या गुरेझ सेक्टरमध्ये मंगळवारी सकाळी हिमकडा कोसळला. या दुर्घटनेत तीन जवान बेपत्ता झाल्याची माहिती आहे.

Snowflake collapses in Kashmir's Gurez Sector, three jawans missing | काश्मीरच्या गुरेझ सेक्टरमध्ये हिमकडा कोसळला, सहा जवान बेपत्ता

काश्मीरच्या गुरेझ सेक्टरमध्ये हिमकडा कोसळला, सहा जवान बेपत्ता

ठळक मुद्देबांदीपोरा जिल्ह्यात येणारे गुरेझ खोरे श्रीनगरपासून 150 किलोमीटर अंतरावर आहे. जानेवारी महिन्यात गुरेझ सेक्टरमध्ये हिमकडा कोसळण्याच्या दोन वेगवेगळया घटना घडल्या होत्या.

श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या गुरेझ सेक्टरमध्ये मंगळवारी सकाळी हिमकडा कोसळला. या दुर्घटनेत भारतीय लष्कराचे सहा जवान बेपत्ता झाल्याची माहिती आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात गुरेझ सेक्टरमध्ये हिमकडा कोसळण्याच्या दोन वेगवेगळया घटना घडल्या होत्या. यात 14 जवानांचा मृत्यू झाला होता. 

बांदीपोरा जिल्ह्यात येणारे गुरेझ खोरे श्रीनगरपासून 150 किलोमीटर अंतरावर आहे. हिवाळयात इथे मोठ्या प्रमाणात होणा-या बर्फवृष्टीमुळे या भागाचा संपूर्ण काश्मीरशी संपर्क तुटतो. गुरेझ सेक्टर नियंत्रण रेषेजवळ असून पाकिस्तानी दहशतवादी ब-याचदा याच मार्गाने घुसखोरीचा प्रयत्न करतात. 

Web Title: Snowflake collapses in Kashmir's Gurez Sector, three jawans missing