शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
3
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
4
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
5
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
6
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
7
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
8
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
9
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
10
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
11
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
12
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
13
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
14
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
15
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
16
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
17
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
18
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
19
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

एसएनडीएलच्या कंत्राटदारांचा संप मागे

By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST

ग्राहकांना दिलासा : मागण्यावर तोडगा निघालानागपूर : वीज वितरण फ्रेन्चाईजी-एसएनडीएल व त्यांचे कंत्राटदार यांच्यात समेट झाल्याने गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेला संप शुक्र वारी सायंकाळी कंत्राटदारांनी मागे घेतला.थकबाकी देण्याचे आश्वासन मिळाल्याने कंत्राटदारांची संघटना व्हेन्डर असोसिएशनने संप मागे घेत असल्याची घोषणा केली. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता कंत्राटदारांंनी काम ...


ग्राहकांना दिलासा : मागण्यावर तोडगा निघाला
नागपूर : वीज वितरण फ्रेन्चाईजी-एसएनडीएल व त्यांचे कंत्राटदार यांच्यात समेट झाल्याने गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेला संप शुक्र वारी सायंकाळी कंत्राटदारांनी मागे घेतला.
थकबाकी देण्याचे आश्वासन मिळाल्याने कंत्राटदारांची संघटना व्हेन्डर असोसिएशनने संप मागे घेत असल्याची घोषणा केली. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता कंत्राटदारांंनी काम सुरू केले. ग्राहकांचे हित विचारात घेता हा निर्णय घेतल्याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
थकबाकी देत नसल्याचा आरोप करीत कंत्राटदारांनी संप पुकारला होता. चर्चेतून तोडगा न निघाल्याने कंत्राटदारांनी दुसऱ्या दिवशीही कार्यालये बंद ठेवली होती. शुक्रवारी सकाळी एसएनडीएल व संघटनांचे प्रतिनिधी यांच्यात बैठक झाली. यात मागण्यावर तोडगा निघाला.
बैठकीत कंपनीतर्फे एक्सेल समूहाचे वित्त प्रमुख हिमांशू शाह , व्यापार प्रमुख सोनल खुराणा, महाप्रबंधक मुकेश धिंगरा तर कंत्राटदारांतर्फे नरेंद्र जिचकार, जावेद अख्तर, सुनील वत्स, रामू कनौजिया, महेंद्र जिचकार, रोशन ठाकूर व अजय त्रिपाठी आदींचा समावेश होता. ३० जानेवारीपर्यत थकबाकी न मिळाल्यास पुन्हा संप पुकारण्याचा इशारा कंत्राटदारांनी दिला आहे.(प्रतिनिधी)
चौकट....
असा झाला समेट
चर्चेत ठरल्यानुसार स्पॅन्कोच्या काळातील थकबाकी २४ तारखेपर्यंत तर त्यानंतरची थकबाकी ३० जानेवारीपर्यत देण्यात यावी तसेच हकनाक कपात करण्यात आलेली दंडाची रक्कम परत करण्यात यावी. भविष्यात असा प्रकार घडणार नसल्याचे आश्वासन कंपनीकडून देण्यात आले आहे.