शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

स्मृती इराणी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाच्या दावेदार ?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2017 9:28 AM

यावेळी भाजपा विजय रुपानी यांना मुख्यमंत्रीपदाची उमेदवारी न देता नव्या चेह-याला संधी देणार असल्याची माहिती आहे.  केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना गुजरातच्या नव्या मुख्यमंत्री केलं जाण्याची शक्यता आहे. 

अहमदाबाद - गुजरात विधानसभा निवडणुकीभाजपाने पुन्हा एकदा विजय मिळवला आहे. 182 जागांच्या विधानसभेत भाजपाने 99 जागा जिंकल्या असून, दुसरीकडे राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रसने 77 जागांवर विजय मिळवला आहे. गुजरातमध्ये पुन्हा एकदा आपलं सरकार स्थापन करण्यासाठी भाजपा सज्ज झाली आहे. सलग सहाव्यांदा भाजपा आपलं सरकार स्थापन करणार आहे. भाजपाने निवडणूक जिंकल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चाही रंगू लागली आहे. यावेळी भाजपा विजय रुपानी यांना मुख्यमंत्रीपदाची उमेदवारी न देता नव्या चेह-याला संधी देणार असल्याची माहिती आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना गुजरातच्या नव्या मुख्यमंत्री केलं जाण्याची शक्यता आहे. 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्मृती इराणी यांची नेतृत्वक्षमता पाहता मुख्यमंत्रीपदासाठी त्यांना पहिली पसंती आहे. मात्र अद्याप यासंबंधी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. स्मृती इराणी यांनीदेखील हे वृत्त फेटाळत आपण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसल्याचं म्हटलं आहे. 

याशिवाय केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि नौवहन राज्यमंत्री मनसुख मांडविया यांचं नावही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहे. मनसुख मांडविया पाटीदार समाजाचे आहेत. ते शेतक-यांचे जवळचे नेते आहेत. कर्नाटकचे राज्यपाल आणि गुजरात विधानसभाचे माजी अध्यक्ष वजूभाई वाला यांचं नावही चर्चेत आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे बालेकिल्ला म्हणून ओळखले जाणारे गुजरात हे राज्य राखण्यात भाजपाला कसेबसे यश मिळाले असून, हिमाचल प्रदेश मात्र काँग्रेसने आपल्या हातातून गमावले आहे. मोदींनी गुजरात जिंकले पण, काठावरचे बहुमत मिळाल्यामुळे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हेच बाजीगर ठरले आहेत. गुजरातमध्ये भाजपाला १८२ पैकी जेमतेम ९९ जागा तर काँग्रेसने ८0 जागांवर यश मिळविले आहे. तिथे बहुमतासाठी ९२ जागांची गरज होती.

हिमाचल प्रदेशात मात्र काँग्रेसचे पानिपतच झाले. तेथील ६८ जागांपैकी ४४ जागा जिंकून देशातील आणखी एक राज्य भाजपाने आपल्याकडे खेचले आहे. देशातील १३ राज्यांत आता भाजपाची स्वबळावर सत्ता असेल. महाराष्ट्र, बिहार व जम्मू-काश्मीरमध्ये मित्रपक्षांसमवेत भाजपा सत्तेवर असल्याने राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे १६ राज्ये आहेत. हे घवघवीत यश मिळवताना मात्र भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार प्रेमकुमार धुमल पराभूत झाले. पक्षासाठी हा मोठा धक्का असून, तिथे पक्षाला नवा नेता शोधावा लागणार आहे.

 

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017