शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
2
India Womens T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
3
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
4
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
5
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
6
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
7
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
9
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
10
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
11
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
12
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
13
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
14
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
15
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
16
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
17
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
18
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
19
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
20
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट ग्राम सुविधांनी परिपूर्ण असावे आ. बबनराव शिंदे - शब्दांकन : डी.एस. गायकवाड

By admin | Updated: February 19, 2016 00:40 IST

स्मार्ट ग्राम सुविधांनी परिपूर्ण असावे

स्मार्ट ग्राम सुविधांनी परिपूर्ण असावे
आ. बबनराव शिंदे - शब्दांकन : डी.एस. गायकवाड

स्मार्ट ग्राम निर्माण करण्यासाठी प्रशासनाचे सक्षमीकरण, विविध कामांची अंमलबजावणी, पर्यावरण संरक्षण, वनीकरण, स्वच्छता, जलसंधारण, आरोग्य या मूलभूत सुविधांनीयुक्त व आरोग्याने परिपूर्ण अशी गावे निर्माण झाली पाहिजेत. यापैकी प्रत्येक मुद्यावर आमदार शिंदे यांनी दिलखुलास विचार मांडले.
स्वच्छता :
स्वच्छता हा आरोग्याचा पाया आहे, या दृष्टीने प्रत्येक गाव हागणदारीमुक्त झाले पाहिजे. प्रत्येक कुटुंबात शौचालय असले पाहिजे व त्याचा वापर झाला पाहिजे. जेथे जागेचा प्रश्न असेल तेथे पाच-सहा कुटुंबात एक शौचालय बांधले पाहिजे. ज्या गावांना निर्मलग्राम पुरस्कार मिळालेत, हागणदारीमुक्त गावाची घोषणा झाली तेथे आजही 30 टक्के नागरिक उघड्यावर शौचालयास जातात ही स्थिती बदलली पाहिजे.
प्रत्येकाने आपले अंगण व परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. जागा असेल तेथे झाडे लावावीत.
ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय अस्तित्वात आहेत; परंतु या ठिकाणी वैद्यकीय अधिकार्‍यांची कमतरता आहे. डॉक्टरांच्या नेमणुका केल्या पाहिजेत. प्रत्येक आरोग्य केंद्रात रक्त, लघवी व इतर तपासण्यासाठी लॅब असली पाहिजे. पुरेसे कर्मचारी असावेत. महत्त्वाचे म्हणजे ग्रामीण स्त्रियांच्या बाळंतपणासाठी सुसज्ज अशी सोय असावी व अद्ययावत ऑपरेशन थिएटर असावे.
ग्रामपंचायत प्रशासन पारदर्शी व गतिमान असले पाहिजे, तलाठी, ग्रामसेवक व कृषी अधिकारी एकच व्यक्ती असली पाहिजे. यामुळे नागरिकांना त्रास होणार नाही. ग्राम पातळीवरील कर्मचार्‍यांनी 11 ते 5 कार्यालयात थांबले पाहिजे. ग्रामसेवकास स्थानिक पातळीवरील सर्व दाखले देण्याचे अधिकार असले पाहिजेत. सामान्य शेतकर्‍यास त्रास न देता खरेदीनंतर वेळेत नोंदी लावल्या पाहिजेत.
सतत पडणारा दुष्काळ व पाणी टंचाई हा ग्रामीण भागातील गंभीर प्रश्न बनला आहे. यावर कायमस्वरुपी मार्ग काढण्यासाठी पावसाचा प्रत्येक थेंब न थेंब जमिनीत जिरवला पाहिजे. ओढे-नाले यांचे खोलीकरण करून पाणी अडवले पाहिजे. गावात पाझर तलाव, नाला बंडिंगची कामे मोठय़ा प्रमाणात झाली पाहिजेत. शेतीसाठी आता प्रवाही पद्धतीने पाणी देणे परवडणारे नाही. त्यासाठी ठिबक सिंचनाद्वारे शेती ही लोकचळवळ बनली पाहिजे, संपूर्ण गाव ठिबक सिंचन केलेले असावे.
लोकांना शुद्ध पाणी देण्यासाठी आर.ओ. प्लांट उभारून माफक किमतीत ते नागरिकांना दिले तर आरोग्याचा प्रश्न राहणार नाही.
गावात व परिसरात मोठय़ा प्रमाणावर वृक्ष लागवड केली पाहिजे. धुरमुक्त गाव संकल्पना राबवून चुलीचा वापर न करता गॅसचा वापर केला पाहिजे. रोजगार हमीच्या कामाद्वारे वृक्ष लागवड मोहीम हाती घेण्याची गरज आहे.
ग्रामीण भागातील जि.प. प्राथमिक शाळेतील गुणवत्ता वाढली पाहिजे. अंगणवाडी, प्राथमिक शिक्षणाबरोबरच प्रत्येक गावात उच्च माध्यमिक शिक्षणाची सोय असली पाहिजे. विशेषकरून सायन्स शाखेची गरज आहे. शासनाने शिक्षण कर माफ केला पाहिजे, त्यामुळे पीकपाण्याची नोंद अचूक होईल. खोटी माहिती कोणी देणार नाही व त्यामुळे शासनास विविध योजनांचे अचूक नियोजन करता येईल.
शासनाच्या विविध योजना सुलभ होण्यासाठी व जनतेला त्रास होऊ नये म्हणून आलेल्या प्रत्येक अर्जाची संबंधित कार्यालयात नोंद असली पाहिजे. आलेल्या अर्जांचा निपटारा वेळेत केला पाहिजे.
संजय गांधी निराधार योजना, र्शावणबाळ योजना, बी.पी.एल. यासारख्या योजनांची माहिती व लाभ मिळवून देण्यासाठी एनजीओचा वापर केला पाहिजे.
‘स्मार्ट ग्राम’ कल्पनेबाबत विस्ताराने बोलताना आमदार बबनराव शिंदे म्हणाले की, गावपातळीवर जमिनीच्या बांधावरून व गावातील रस्त्यावरून सतत भांडणे होत असतात, त्यामुळे गावची शांतता व सलोखा धोक्यात येत असते. यासाठी शेतातील बांध व रस्ते यांची मोजणी करून खुणा करून दिल्यास भांडणे होणार नाहीत.
वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन गावठाण वाढवून घेतले पाहिजे व जेथे अतिक्रमण करून घरे बांधली आहेत ती नियमित केली पाहिजेत, जेणेकरून गरीब माणसे विस्थापित होणार नाहीत.
गावपातळीवर या सर्व गोष्टी करत असताना फक्त शासनावर अवलंबून न राहता लोकसहभागातून व लोकांना विश्वासात घेऊन पारदर्शी कारभार केला तर गावे स्मार्ट होतील.