शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

पारेषणविरहित प्रकल्पांमुळे लघु-मध्यम उद्योगांना संधी

By admin | Updated: January 30, 2016 00:17 IST

सौर ऊर्जानिर्मितीचे एकत्रित धोरण जाहीर : ऊर्जामंत्री बावनकुळे यांचा विश्वास नागपूर : राज्यातील विजेची वाढती मागणी लक्षात घेता, ती पूर्ण करण्यासाठी राज्य शासन अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा प्राधान्याने विकास करणार आहे. यात पारेषणविरहित नवीन व नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांमुळे राज्यातील लघु व मध्यम उद्योगांना व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध होईल. शिवाय रोजगार निर्मिती आणि ...


सौर ऊर्जानिर्मितीचे एकत्रित धोरण जाहीर : ऊर्जामंत्री बावनकुळे यांचा विश्वास
नागपूर : राज्यातील विजेची वाढती मागणी लक्षात घेता, ती पूर्ण करण्यासाठी राज्य शासन अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा प्राधान्याने विकास करणार आहे. यात पारेषणविरहित नवीन व नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांमुळे राज्यातील लघु व मध्यम उद्योगांना व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध होईल. शिवाय रोजगार निर्मिती आणि गुंतवणुकीस चालना मिळेल, असा विश्वास राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला .
विशेष म्हणजे, राज्य शासनाने पारेषणविरहित ऊर्जा निर्मिती प्रकल्प विकसित करण्यासाठी नवीन व नवीकरणीय ऊर्जा स्रोतांच्या वापरास चालना देण्यासाठी एकत्रित धोरण जाहीर केले आहे. या धोरणानुसार सौर ऊर्जास्रोतांचा प्रसार वाढविण्याच्या दृष्टीने घरगुती व औद्योगिक क्षेत्रात निर्माण होणाऱ्या सेंद्रीय टाकऊ पदार्थापासून वीज निर्मिती व सेंद्रीय खत निर्मितीस चालना मिळणार आहे. या नवीन धोरणाचा परिणाम म्हणून पुढील पाच वर्षात राज्यात सौर विद्युत पंप, उष्णजल संयंत्र, सोलर स्टीम कुकिंग व बॉयोगॅसपासून वीज निर्मिती प्रकल्प सुरू होतील.
नवीन व नवीकरणीय ऊर्जेच्या विकासासाठी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण संस्थेची पदनिर्देशित व मूलाधार संस्था म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या धोरणातर्गंत प्रकल्पांना महाऊर्जाकडून तांत्रिक मान्यता देण्यात येणार आहेत. तसेच राज्यातील शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा शासनाशी संबंधित विभागांनी कोणत्याही निधीतून या धोरणातर्गंत उल्लेखित अथवा इतर अपारंपरिक ऊर्जेची संयंत्रे बसविताना महाऊर्जाकडून तांत्रिक मान्यता व तांत्रिक मोजमाप घेणे बंधनकारक आहे. अपारंपरिक ऊर्जेच्या विकासासाठी व प्रकल्पासाठी पुढील पाच वर्षांसाठी २६८२ कोटींचा निधी जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना, १३ वा वित्त आयोग आणि हरित ऊर्जा निधीतून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
.....