भीषण अपघात! कर्नाटकातील चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 08:50 IST2025-12-25T08:50:43+5:302025-12-25T08:50:43+5:30
अपघातग्रस्त बस बेंगळुरूहून गोकर्णला जात होती, अशी माहिती मिळाली आहे. एसपी रणजीत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. ही घटना हिरीयुर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.

भीषण अपघात! कर्नाटकातील चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
चिकोडी : कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यात गुरुवारी पहाटे एक मोठा रस्ता अपघात घडला. एका खाजगी स्लीपर बसची ट्रक (लॉरी) शी टक्कर झाली. धडक इतकी भीषण होती की स्लीपर बसने पेट घेतला. या अपघातात किमान १७ जणांचा मृत्यू झाला.
माहितीनुसार, बस बंगळुरूहून शिवमोगाला जात होती. स्लीपर बसला ३०० किलोमीटरहून अधिक प्रवास करावा लागला. हा अपघात राष्ट्रीय महामार्ग ४८ (एनएच-४८) वर झाला. या अपघातात २५ हून अधिक जण गंभीर जखमी झाले.
विरुद्ध दिशेने येणारा कंटेनर दुभाजक उडवून बसला धडक दिली. यामुळे डिझेल टाकीचा स्फोट झाला. मोठी आग लागली. बस बंगळुरहून गोकर्णकडे जात होती तर कंटेनर हिरियुरहून बंगळुरूला जात होता. सदर बस सी बर्ड कोच टुरिस्ट बस असून बस मध्ये १४ महिला व १५ पुरुष प्रवास करीत होते.
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
अपघातानंतर बस चालक, कंडक्टर आणि प्रवाशांनी बसमधून उड्या मारल्या यामुळे ते वाचले. लॉरी चालक कुलदीप याचा मृत्यू झाल्याचे समजते. अपघातानंतर, राष्ट्रीय महामार्ग ४८ वर सुमारे ३० किमी वाहतूक कोंडी झाली होती. शिरा पर्यंत हजारो वाहने अनेक किलोमीटरपर्यंत उभी होती.
अपघातग्रस्त बस बेंगळुरूहून गोकर्णला जात होती, अशी माहिती मिळाली आहे. एसपी रणजीत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. ही घटना हिरीयुर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.
बसमध्ये चालक आणि वाहक असे एकूण ३१ जण प्रवास करत होते. २५ जण गोकर्णाचे, दोन कुमटा आणि दोन शिवमोगा येथील असल्याचे कळते.
बुकिंगच्या तपशीलांनुसार, मंजुनाथ, संध्या, शशांक, दिलीप, प्रीतीश्वरन, व्ही. बिंदू, के. कविता, अनिरुद्ध बॅनर्जी, अमृता, ईशा, सूरज, मनसा, मिलना, हेमराज कुमार, कल्पना प्रजापती, एम. शशिकांत, विजय भंडारी, नव्या, अभिषेक, एच. किरण पाल, एम. कीर्तन हे प्रवासी होते. मृत आणि जखमींची माहिती अजून मिळालेली नाही.
VIDEO | Chitradurga, Karnataka: Over 10 people are feared dead in a lorry-bus collision on National Highway 48 near Gorlathu village in Hiriyur taluk.
— Press Trust of India (@PTI_News) December 25, 2025
The bus, travelling from Bengaluru to Shivamogga, caught fire following the crash. Nine passengers reportedly escaped unhurt,… pic.twitter.com/dj75qIiIws