शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 12:17 IST

Skymet Monsoon Forecast 2026: यंदाच्या मान्सूनबाबत चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. यंदाच्या मान्सूनवर एल निनोचा प्रभाव जाणवणार असून, त्यामुळे यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा अंदाज स्कायमेट या खाजगी हवामान संस्थेने वर्तवला आहे.

Rainfall Prediction 2026 in India: गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसाने राज्यातील शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान केलं आहे. याचदरम्यान, आता यंदाच्या मान्सूनबाबत चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. यंदाच्या मान्सूनवर एल निनोचा प्रभाव जाणवणार असून, त्यामुळे यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांदरम्यान सरासरीच्या ९४ टक्के एवढा पाऊस पडेल, असा अंदाज स्कायमेट या खाजगी हवामान संस्थेने वर्तवला आहे.

बदलत चाललेलं हवामान आणि ऋतुचक्रामुळे शेतकऱ्यांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. भारतात बहुतांश शेती ही मान्सूनच्या पावसावर अवलंबून असते. त्यामुळे मान्सूनच्या वाटचालीकडे शेतकऱ्यांसह देशातील आर्थिक विश्वाचं लक्ष लागलेलं असतं. दरम्यान, यावर्षीही मान्सूनवर परिणाम करणाऱ्या एल निनोचा प्रभाव जाणवणार असल्याचे स्कायमेटने यंदाच्या मान्सूनसाठीचा आपला अंदाज जाहीर करताना म्हटले आहे. स्कायमेटने वर्तवलेल्या अंदाजानुसार, हंगामाच्या दुसऱ्या सहमाहीतही एल निनोची तीव्रता वाढणार आहे. तसेच त्याचा परिणाम मान्सूनवर होणार आहे. जून ते सप्टेंबर या मान्सूनच्या कालावधीपैकी जून महिन्यामध्ये मान्सून हा स्थिर राहणार आहे. तर जुलै ते सप्टेंबर या काळात पावसाची तीव्रता कमी होणार आहे. तसेच एकूण जून ते सप्टेंबर या काळात सरासरीच्या ९४ टक्के एवढं पर्जन्यमान होईल, अशी शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे.

देशातील मध्य आणि उत्तर-पश्चिम भागामध्ये कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा फटका शेतीला बसू शकतो. दरम्यान, भारतीय हवामान खात्याकडून देशातील मान्सूनसाठीचा आपला पहिला अंदाज पुढच्या काही दिवसांमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Below-average Rainfall Expected This Year; Skymet Predicts Uneven Monsoon

Web Summary : Skymet forecasts below-average monsoon rainfall due to El Nino, impacting Indian agriculture. June will see stable rainfall, but July-September may experience reduced intensity. Overall rainfall is expected to be 94% of the average, with central and northwest India potentially facing deficits.
टॅग्स :Monsoon forecastमोसमी पावसाचा अंदाजweatherहवामान अंदाजIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्रmonsoonमोसमी पाऊसRainपाऊसFarmerशेतकरीMonsoon Specialमानसून स्पेशल