शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

आसाममध्ये सहा दहशतवाद्यांना घातले कंठस्नान

By admin | Updated: September 24, 2016 05:49 IST

शुक्रवारी सकाळी लष्कर आणि करबी पीपल्स लिबरेशन टायगर्सच्या (केपीएलटी) दहशताद्यांमध्ये जोरदार चकमक झाली.

दीफू : आसामच्या करबी अँगलाँग जिल्ह्यामध्ये शुक्रवारी सकाळी लष्कर आणि करबी पीपल्स लिबरेशन टायगर्सच्या (केपीएलटी) दहशताद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीत लष्कराने केपीएलटीच्या सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. केपीएलटीचे दोन म्हारकेही या चकमकीत मारले गेले असून, चकमकीमध्ये लष्कराचा एक जवानही जखमी झाला आहे. सुरक्षा दलांना मिळालेल्या विशेष माहितीच्या आधारावर बानीपठारच्या जंगलात लष्कराने स्थानिक पोलिसांच्या मदतीने गुरुवारी मध्यरात्रीनंतर एक वाजण्याच्या सुमारास कारवाई सुरू केली. लष्कर आणि पोलीस आपणास पकडण्यास आल्याचे लक्षात येताच, केपीएलटीच्या दहशतवाद्यांनी त्यांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्यात लष्कराचा एक जवान जखमी झाला.त्यानंतर भारतीय जवानांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार सुरू केला. त्यातसहा दहशतवादी ठार झाले. ठर झालेल्या दहशतवाद्यांमध्ये केएलपीटीचे दोन म्हारके असल्याचे सांगण्यात आले. उरलेल्या चौघा मृत दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. जखमी जवानाला रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरक्षा दलांनी त्या ठिकाणहून एक एसएलआर रायफल, इनसास (इंडियन स्मॉल आर्म सिस्टिम) रायफल, तीन पिस्तुले आणि दोन ग्रेनेड ताब्यात घेतले आहेत. केएलएनएफने (करबी नॅशनल लिबरेशन फ्रंट) शस्त्रसंधी जाहीर केल्यानंतर त्यातून फुटून २0१0-११ मध्ये केएलपीटी या नव्या दहशतवादी गटाची स्थापना झाली होती. (वृत्तसंस्था)>अत्याधुनिक शस्त्रे आणि स्फोटके असल्याचे आढळलेआसाममधील करबी जिल्हा वेगळा करून, त्याला स्वायत्त राज्य म्हणून मान्यता द्यावी, अशी या संघटनेची मागणी आहे. अरुणाचल प्रदशच्या काही भागांतही या संघटनेचे वर्चस्व असून, या संघटनेकडे सर्व प्रकारची एके४७, एके५६, एम२0 गन्स यासारखी अनेक अत्याधुनिक शस्त्रे आणि स्फोटके असल्याचे वेळोवेळी आढळून आले आहे.