शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

जादू टोण्यातून सहा लाखांची फसवणूक

By admin | Updated: August 31, 2015 00:24 IST

एका महिलेला अटक : अंनिसच्या मदतीने पोलिसांची कारवाई

एका महिलेला अटक : अंनिसच्या मदतीने पोलिसांची कारवाई
नातेपुते : नातेपुते-दहिगाव रस्त्यावरील 44 फाटा येथील सुनीता उर्फ ताई रमेश विटकर या महिलेने जादूटोणा व बुवाबाजी करून पाच ते सहा लाखांची फसवणूक केली. याबाबत वसंत तात्याबा माने (रा. कोथळे, ता. माळशिरस) यांनी नातेपुते पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी अंधर्शद्धा निर्मूलन समितीच्या मदतीने सुनीता विटकर या महिलेस अटक केली आहे.
फिर्यादी वसंत तात्याबा माने यांचा माल वाहतुकीचा व्यवसाय आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचा मुंबई येथे रेल्वे प्रवासात स्टेशनवर उतरत असताना तोल जाऊन अपघात झाला होता. डाव्या पायाला दुखापत झाली होती. त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचार कोल्हापूर येथे चालू होते. यादरम्यान नातेपुते येथे एक महिला असून ती पितरे, चेटूक, भूतबाधा काढते असे समजले. कोल्हापूर येथून डिस्चार्ज दिल्यानंतर नातेवाईक नातेपुते येथील सुनीता विटकर यांच्याकडे घेऊन गेले. वसंत माने यांना मधुमेहाचा त्रास असल्याने व तिने केलेल्या अघोरी कृत्यामुळे जखमा आणखी गंभीर बनल्या. फसवणुकीबद्दल वसंत माने यांनी नातेपुते पोलिसात फिर्याद दिली असून, पोलिसांनी या महिलेस अटक करून जादूटोणा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय खाडे, ठाणे अंमलदार शशिकांत आळणे, पो. हे. कॉ. गडदे, चंद्रकांत सूळ, पो. हे. कॉँ. नीता शेळके करीत आहेत.
करणीच्या बाधेची बतावणी
सुनीता विटकर हिने वसंत माने यांना शारीरिक त्रास नसून करणीची बाधा असल्याचे सांगून दूध, दही, झाडाची पाने, अंगारा टाकून त्यांना अंघोळ घातली व जखम त्याच पाण्याने धुतली. देवीची जत्रा करण्यास भाग पाडून 40 हजार रुपयांप्रमाणे आठ ते दहा जत्राही केल्या. यामध्ये 5-6 लाख रुपये खर्च झाले. तरी काहीही फरक पडला नाही.