शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

देशात सहा टक्के कर्करोगाचे बळी, जगात मिनिटाला १७ व्यक्तींचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 07:30 IST

Cancer News : जगात प्रत्येक मिनिटाला १७ व्यक्तींचा कर्करोगामुळे मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे. याखेरीज, जगातील एकूण कर्करोग रुग्णांच्या मृत्यूंत सहा टक्के मृत्यू हे देशातील आहेत.

मुंबई : जगात प्रत्येक मिनिटाला १७ व्यक्तींचा कर्करोगामुळे मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे. याखेरीज, जगातील एकूण कर्करोग रुग्णांच्या मृत्यूंत सहा टक्के मृत्यू हे देशातील आहेत. यापूर्वी, जगात पाचपैकी एक कर्करोग रुग्ण हा देशातील असल्याचे निरीक्षण नोंदविले होते, तर याचे प्रमाण आता चारवर आले आहे. यंदा जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने आय एम अँड आय विल हा जनजागृतीपर संदेश देण्यात येणार आहे. या माध्यमातून सुदृढ जीवनशैलीचा अवलंब करा, कर्करोगाचा धोका टाळण्याचे आवाहन जागतिक स्तरापासून ते स्थानिक स्तरापर्यंत कऱण्यात येणार आहे. कर्करोग तज्ज्ञ डॉ. अनुप ताम्हणकर म्हणाले, कर्करोग होण्यास कारणीभूत असलेल्या  गोष्टी टाळण्यासाठी  निरोगी जीवनाचा अवलंब केला पाहिजे. संतुलित आहार व वजन नियंत्रणात ठेवून शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहिले पाहिजे. लठ्ठपणाने आता जगभरातील पौगंडावस्थेतील २० ते ३० टक्के लोकांना प्रभावित केले आहे. लठ्ठपणानंतरच्या आयुष्यात आतड्यांसंबंधी, स्तन, गर्भाशय, स्वादुपिंड, आणि पित्ताशयाचा कर्करोग होण्याच्या जोखमीशी जोडलेला आहे.स्त्री कर्करोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र केरकर म्हणाले, हा कर्करोग ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही)सारखे विषाणू, जननेंद्रियाची अस्वच्छता, कमी वयातील लैंगिक संबंध, एकापेक्षा अनेक पुरुषांसोबत असलेला लैगिक संबंध, आदी गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला कारणीभूत ठरतात. वारंवार होणाऱ्या एचपीव्ही संक्रमणाकडे दुर्लक्ष केल्यास पुढील १० ते १५ वर्षांत त्याचे रूपांतर गर्भाशय मुखाच्या कर्करोगात होते.  चिंताजनक बाब म्हणजे अशा प्रकारचा कर्करोग हा ३५ ते ४५  वयोगटात आढळून येत आहे.गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा धोका २.४% वाढलागर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण हे वाढत चालले आहे. या कर्करोगाची रुग्णसंख्या पाहता जगातील २० टक्के रुग्ण हे केवळ भारतात आढळून येतात. स्तनांच्या कर्करोगानंतरच्या स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळणारा हा दुसऱ्या क्रमांकाचा कर्करोग आहे. २०२० मध्ये अशा प्रकारच्या कर्करोगामध्ये दर १०,००,००० महिलांमध्ये २२ नवीन प्रकरणांचे निदान झाले असून गर्भाशय मुखाचा कर्करोग होण्याचा धोका २.४ टक्क्यांनी वाढला आहे.

टॅग्स :cancerकर्करोगHealthआरोग्यIndiaभारत