काश्मीरमधील परिस्थिती संवेदनशील, पण नियंत्रणात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 10:37 IST2026-01-14T10:36:52+5:302026-01-14T10:37:32+5:30
लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे वक्तव्य

काश्मीरमधील परिस्थिती संवेदनशील, पण नियंत्रणात
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती संवेदनशील असली तरी ती नियंत्रणात आहे, असे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी मंगळवारी सांगितले. ते म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे. शत्रूने कोणतेही दुःसाहस केले तर त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात येईल, असा इशाराही त्यांनी पाकिस्तानला दिला. त्यांनी सांगितले की, चीनसोबत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर असलेली परिस्थिती स्थिर आहे, मात्र तिथे सातत्याने दक्षता बागळण्याची गरज आहे. त्या देशाशी पुन्हा सुरू झालेला संपर्कामुळे परिस्थिती सामान्य होण्यास हातभार लागत आहे
विकसित भारताचे ध्येय साध्य होणार : सीडीएस योग्य दिशा आणि वेग असल्यास देश 'विकसित भारत'चे ध्येय नक्की साध्य करेल, असे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी सांगितले. दिल्ली कॅन्टोन्मेंट येथे राष्ट्रीय छात्रसेना प्रजासत्ताक दिन शिबिरातील कॅडेटसमोर केलेल्या भाषणात ते म्हणाले की, आपला देश अत्यंत निर्णायक वळणावर उभा आहे. २०४७ पर्यंत आपल्याला विकसित राष्ट्र व्हायचे आहे.