साहेब मला वाचवा! बायको गरम चिमट्याने मारते हो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 08:58 IST2022-11-18T08:57:51+5:302022-11-18T08:58:13+5:30

Uttar Pradesh: नवरा- बायकोच्या भांडणाचे अनेक किस्से समोर येत असतात. मात्र, उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात एक वेगळीच घटना समोर आली आहे.

Sir, save me! Wife hits with hot tongs... | साहेब मला वाचवा! बायको गरम चिमट्याने मारते हो...

साहेब मला वाचवा! बायको गरम चिमट्याने मारते हो...

हमीरपूर  - नवरा- बायकोच्या भांडणाचे अनेक किस्से समोर येत असतात. मात्र, उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात एक वेगळीच घटना समोर आली आहे. साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा, ती मला गरम चिमट्याने मारहाण करते, अशी विनंती एका व्यक्तीने रडत रडत पोलिसांकडे केली. या प्रकरणात पतीने पत्नीविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, कार विकण्यावरून पती- पत्नीमध्ये वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे.
पीडित व्यक्तीने रडून पोलिसांना सांगितले की, त्याची पत्नी त्याच्यावर खूप अत्याचार करते. या त्रासातून माझी सुटका करा. 

काय आहे तक्रार? 
पठाणपुरा भागात राहणाऱ्या संजयने आपल्या पत्नीविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यात म्हटले आहे की, त्याच्याकडे एक कार आहे आणि त्याची पत्नी कुसुम हिला गाडी विकून तिच्या आई- वडिलांना पैसे पाठवायचे आहेत. त्याने गाडी विकण्यास नकार दिल्यावर पत्नीने त्याला गरम चिमट्याने बेदम मारहाण केली.

Web Title: Sir, save me! Wife hits with hot tongs...