सिंगल क्र ाईम प?ा

By Admin | Updated: June 12, 2015 17:38 IST2015-06-12T17:38:05+5:302015-06-12T17:38:05+5:30

मनपातून टेंडर फाईल पळवली

Single order form | सिंगल क्र ाईम प?ा

सिंगल क्र ाईम प?ा

पातून टेंडर फाईल पळवली
सोलापूर : मनपातून 96,585 रुपयांची टेंडर फाईल पळविल्याचा प्रकार 29 मे रोजी दुपारी 1़44 वाजता घडला़ याबाबत सागर प्रदीप पतंगे या अधिकार्‍याने सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आह़े याप्रकरणी पोलिसांनी सुनंदा सुतार या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आह़े पतंगे हे त्या दिवशी दुपारी जेवायला गेले होत़े यावेळी कार्यालयात कोणी नसल्याची संधी साधून सदर महिलेने फाईल पळविल्याचा प्रकार घडला़
घरगुती गॅसचा काळाबाजार
सोलापूर : नडगिरी पेट्रोलपंपाच्या मागे भारत गॅस कंपनीच्या दोन टाक्यांमधून वाहनात गॅस भरत असताना पुरवठा अधिकारी मनोज गायकवाड यांनी एकाला रंगेहाथ पकडल़े याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात जहीर अब्बाद हमीद बडेघर (वय 35, रा़ नडगिरी पेट्रोलपंप मागे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आह़े अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक गलांडे करीत आहेत़
तेजसनगरमध्ये घर फोडले
सोलापूर : होटगी रोडवर किल्लेदार मंगल कार्यालयाच्या बाजूला तेजस नगरमध्ये नबीलाल महेबूब शेख यांचे घर फोडून चोरट्यांनी रोख 1500 रुपयांसह 22,300 रुपयांचे दागिने पळविल़े ही घटना बुधवारी सकाळी ते दुपारी 4 या वेळेत घडली़ याबाबत शेख यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, अधिक तपास फौजदार अमर पाटील करीत आहेत़

Web Title: Single order form