मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 15:36 IST2025-06-09T15:28:00+5:302025-06-09T15:36:09+5:30

कोलंबोहून मुंबईला जाणाऱ्या 'MV WAN HAI 503' या कंटेनर जहाजात मोठा स्फोट झाला. या अपघातात ४ क्रू मेंबर्स बेपत्ता आहेत आणि ५ जण जखमी झाले आहेत.

Singapore container ship MV WAN HAI 503 catches fire off Kerala coast rescue operation | मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता

मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता

केरळच्या किनाऱ्याजवळ एका कंटेनर शीपचा मोठा अपघात झाला आहे. समुद्रात कंटेनर वाहतूक करणाऱ्या सिंगापूरचा ध्वज असलेल्या 'MV WAN HAI 503' या  कंटेनर जहाजात स्फोट झाला. हा स्फोट कोचीपासून सुमारे ३१५ किमी पश्चिमेला समुद्रात असलेल्या जहाजाच्या अंडर डेकमध्ये झाला. या स्फोटात चार क्रू मेंबर्स बेपत्ता झाले असून, पाच जण जखमी झाले आहेत. जहाजावर एकूण २२ क्रू मेंबर्स होते आणि हे जहाज कंटेनर्सनी भरलेले होते.

स्फोटानंतर बचाव कार्याला वेग देण्यात आला आहे. घटनास्थळी भारतीय तटरक्षक दल आणि भारतीय नौदलाने तात्काळ मदतीसाठी रवाना झाले. या स्फोटामुळे ५० कंटेनर समुद्रात पडले असल्याचे सांगण्यात आले असून, जहाजावर एकूण ६०० पेक्षा जास्त कंटेनर होते. नौदलाने आपल्या जहाजांसोबत तटरक्षक दलाची तीन जहाजे घटनास्थळी पाठवली आहेत.

स्फोटाचे कारण अस्पष्ट, मदत कार्य सुरू
स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु कंटेनरच्या आतूनच स्फोट झाला असावा असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. भारतीय नौदलाचे जनसंपर्क अधिकारी म्हणाले की, "कोझिकोडच्या बेपोर किनाऱ्याजवळ एका मालवाहू जहाजात स्फोट झाला आहे. हे जहाज सिंगापूरचे ध्वज असलेले कंटेनर जहाज आहे, ज्याची लांबी २७० मीटर आणि ड्राफ्ट १२.५ मीटर आहे. हे जहाज ७ जून रोजी कोलंबोहून मुंबईसाठी निघाले होते."

बेपत्ता क्रू मेंबर्सचा शोध सुरू असून,  जखमींना तात्काळ प्रथमोपचार दिले जात आहेत. तटरक्षक दलाचे डॉर्नियर विमान आणि जहाजे घटनास्थळी रवाना करण्यात आली आहेत. तसेच, घटनास्थळी सर्व मदत पुरवली जात आहे. तटरक्षक दलाने घटनावर लक्ष ठेवून बचाव कार्य सुरू केले आहे. याशिवाय, जहाजावरील उर्वरित क्रू मेंबर्स सुरक्षित असल्याचे म्हटले जात आहे. 

Web Title: Singapore container ship MV WAN HAI 503 catches fire off Kerala coast rescue operation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.