'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 08:59 IST2025-09-29T08:55:58+5:302025-09-29T08:59:05+5:30
लडाखमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लडाखमध्ये झालेला हिंसाचार भडकवल्याचा आरोपही त्यांच्यावर केला आहे. दरम्यान, आता वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली वांगचुक यांनी हे आरोप निराधार असल्याचे सांगत फेटाळून लावले.

'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
लडाख हिंसाचार उफाळल्यानंतर पोलिसांनी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना अटक केली. सोनम वांगचुक यांना लडाखपासून खूप दूर असलेल्या जोधपूर तुरुंगात ठेवण्यात आले आहे. हिंसाचार भडकवल्याबद्दल तसेच राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनम वांगचुक यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. दरम्यान, सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली वांगचुक यांनी प्रतिक्रिया दिली.
सोनम वांगचुक यांच्यावरील सर्व आरोप पूर्णपणे खोटे आणि निराधार असल्याचे गीतांजली वांगचुक म्हणाल्या. त्यांना अटक होऊन ४८ तासांहून अधिक काळ लोटला आहे. सोनम वांगचुक लडाखला राज्याचा दर्जा मिळावा यासाठी उपोषण करत होते.
सोनम वांगचुक यांच्यावर उपोषणादरम्यान लोकांना भडकाऊ भाषणे देऊन भडकावल्याचा आरोप आहे, यामुळे लेहमध्ये हिंसाचार झाला, यामध्ये चार लोकांचा मृत्यू झाला आणि ५० हून अधिक लोक जखमी झाले, असा आरोप करण्यात आला आहे.
गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
गीतांजली वांगचुक म्हणाल्या की, सोनम वांगचुक यांना चार वर्षांपूर्वी लडाखला राज्याचा दर्जा देण्याची आणि सहाव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी सुरू केल्यापासून त्यांना लक्ष्य केले जात आहे.
गीतांजली वांगचुक म्हणाल्या, तपास यंत्रणांनी अनेक वेळा आमचे दार ठोठावले आहे. अधिकाऱ्यांनी आमच्या दोन स्वयंसेवी संस्थांना येणाऱ्या परदेशी निधीवर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. सोनम यांच्या स्वयंसेवी संस्थांवर परदेशी निधी मिळाल्याचा आरोप
सोनम वांगचुक लडाखमध्ये दोन स्वयंसेवी संस्था चालवतात. पहिल्याचे नाव हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह्ज, लडाख (HIAL) आणि दुसऱ्याचे नाव स्टुडंट एज्युकेशनल अँड कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाख असे आहे.
SECMOL ला फॉरेन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलेशन अॅक्ट अंतर्गत परवाना देण्यात आला होता. लडाख हिंसाचारानंतर गेल्या आठवड्यात एनजीओचा परवाना रद्द करण्यात आला.
"सोनम यांनी स्वतः भाजपला मतदान केले आणि त्यांच्या खासदाराने गेल्या निवडणुकीत विजय मिळवला. सर्वांनी त्यांना सत्तेत आणण्यासाठी पाठिंबा दिला, पण ते आमच्या गरजा पूर्ण करण्यात अयशस्वी झाले. सहाव्या अनुसूचीपासून ते लडाखमध्ये विधानसभेच्या स्थापनेपर्यंत काहीही झालेले नाही",असंही गीतांजली वांगचुक म्हणाल्या.
पाकिस्तान कनेक्शनबाबत मोठे विधान
सोनम वांगचुक यांच्या पाकिस्तानशी असलेल्या संबंधावर गीतांजली वांगचुक यांनी प्रतिक्रिया दिली. गीतांजली वांगचुक म्हणाल्या, "जर हे खरे असेल, तर ते गृह मंत्रालयाचे सर्वात मोठे अपयश आहे. एक पाकिस्तानी गुप्तहेर येथे फिरत होता, मग गृह मंत्रालय काय करत होते? ते त्यांच्या कामात अपयशी ठरले. मला त्यांच्याकडून उत्तर हवे आहे."