शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 12:01 IST

पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्या प्रकरणातील एक महत्त्वाचा आरोपी शाहबाज अंसारी सध्या फरार झाला आहे.

पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्या प्रकरणातील एक महत्त्वाचा आरोपी शाहबाज अंसारी, सध्या फरार आहे. गेल्या महिन्यात त्याला दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टातून अंतरिम जामीन मिळाला होता. मे २०२२ मध्ये मूसेवाला यांच्या हत्येसाठी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला शस्त्रे आणि दारुगोळा पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

जामिनावर सुटलेला अंसारी अचानक गायब!उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथील रहिवासी असलेल्या अंसारीला डिसेंबर २०२२ मध्ये अटक करण्यात आली होती. १८ जून रोजी न्यायाधीशांनी त्याच्या पत्नीच्या मणक्याच्या शस्त्रक्रियेसाठी त्याला एका महिन्याचा अंतरिम जामीन मंजूर केला होता. मात्र, आता राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) सांगितले की, अंसारीचा मोबाईल फोन बंद आहे आणि त्याचे लोकेशन ट्रेस करता येत नाहीये. यामुळे तपास यंत्रणांची डोकेदुखी वाढली आहे.

बनावट कागदपत्रे आणि चुकीची माहिती?

एनआयएने कोर्टात सांगितले की, शाहबाज अंसारीने दिलेला फोन नंबर आसाममधील एका व्यक्तीच्या नावावर नोंदणीकृत आहे. जामिनासाठी जामीनदाराने कथितपणे पैसे घेऊन हे काम केले होते. याशिवाय, अंसारीने ज्या गाझियाबाद येथील एमएमजी रुग्णालयाचा उल्लेख केला होता, तिथे अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया होत नाहीत. या धक्कादायक खुलास्यानंतर, NIAने विशेष सरकारी वकील राहुल त्यागी यांच्या माध्यमातून ८ जुलै रोजी अंसारीचा जामीन रद्द करून घेतला. मात्र, अंसारीने कोर्टात हजर होण्याच्या नोटीसकडे दुर्लक्ष केले. त्याच्या वकिलांनी, अमित श्रीवास्तव यांनीही आपल्या अशिलाच्या ठिकाणाबद्दल माहिती नसल्याचे सांगितले.

आधीही जामिनाच्या अटींचा भंगशाहबाज अंसारीने जामिनाच्या अटींचा भंग करण्याची ही पहिलीच वेळ नाही. फेब्रुवारी २०२३ मध्ये त्याला त्याच्या गर्भवती पत्नीसाठी पाच दिवसांचा अंतरिम जामीन मिळाला होता, परंतु त्याने NIAला आपले लोकेशन दिले नाही. त्यामुळे, त्याची ३० दिवसांच्या जामीन वाढवण्याची याचिका फेटाळण्यात आली होती. त्यानंतर, ऑक्टोबर २०२३ आणि जानेवारी २०२४ मध्ये अंसारीच्या बहिणीच्या लग्नासाठी केलेल्या जामीन याचिकाही फेटाळण्यात आल्या. 

आता अंसारीच्या फरार झाल्याने तपास यंत्रणांना त्याचे गुन्हेगारी नेटवर्क पुन्हा सक्रिय होण्याची भीती वाटत आहे. या घटनेमुळे मूसेवाला हत्या प्रकरणाच्या तपासावर आणि न्यायालयीन प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

टॅग्स :Sidhu Moosewalaसिद्धू मूसेवालाCrime Newsगुन्हेगारीPunjabपंजाब