शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

'डिअर मोदीजी, आता टिंगलटवाळी बंद करा, देशातील गंभीर परिस्थितीकडं लक्ष द्या'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2020 3:49 PM

राहुल गांधी यांनी मोदींना लक्ष्य करत, बंद करा तुमचा सोशल मीडियावरील खेळ, असे म्हटले

नवी दिल्ली - सध्या इंटरनेटच्या माध्यमातून अनेक जण सोशल मीडियावर सक्रीय असतात. ट्विटर, फेसबुक या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक एकत्र येतात. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याचं माध्यम म्हणजे सोशल मीडिया आहे. त्यामुळे राजकीय नेते मोठ्या प्रमाणात या माध्यमाचा वापर करताना दिसतात. सोमवारी अचानक नरेंद्र मोदींनी केलेल्या एका ट्विटमुळे खळबळ माजली होती. मात्र, मंगळवारी नरेंद्र मोदींनी याबाबत पुन्हा ट्विट करुन नवीन खुलासा केला आहे. मोदींच्या या ट्विटनंतर काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधींनी संताप व्यक्त केला आहे.  

राहुल गांधी यांनी मोदींना लक्ष्य करत, बंद करा तुमचा सोशल मीडियावरील खेळ, असे म्हटले. देशातील महत्वाच्या विषयांकडे लक्ष द्या. भारत सध्या गंभीर परिस्थितीचा सामना करतोय, सध्या देशापुढे कोरोना व्हायरसचं सर्वात मोठं संकट आहे, त्यावर उपाय करण्याचं बघा, असे म्हणत राहुल यांनी मोदींना लक्ष्य केले. तसेच, चीनच्या प्रधानमंत्री कार्यालयाकडून जारी करण्यात आलेला व्हिडीओही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी ट्विट करत, ८ मार्च, रविवारी जागतिक महिला दिन असल्याने त्यादिवशी माझं सोशल मीडियावरील अकाऊंट महिलांसाठी समर्पित करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलंय. तसेच, ज्या महिलेकडून आपल्या प्रेरणा मिळते तिची यशस्वी गाथा येथे मांडा, लाखो महिलांना प्रेरणा देईल अशा स्टोरी शेअर करा, यासाठी #SheIndpriesUs हा हॅशटॅग वापरा असं आवाहन त्यांनी लोकांना केलं आहे. 

मोदींच्या या ट्विटनंतर राहुल गांधींनी ट्विट करुन आपला राग व्यक्त केला आहे. कारण, मोदींच्या पहिल्या ट्विटनंतर राहुल गाधींनी ट्विट करुन मोदींना सल्ला दिला होता. मात्र, मोदींच्या आजच्या ट्विटनंतर, सोशल मीडिया सोडणार असल्याचं मोदींचं ट्विट केवळ फिरकी घेण्याचा एक भाग असल्याचं स्पष्ट झालंय.   

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीTwitterट्विटरSocial Mediaसोशल मीडिया